Gadchiroli District APMC Analysis : अहेरी, सिरोंचात दोन राजे एकत्र येऊनही आदिवासी विद्यार्थी संघटनेचाच जलवा !

Ajay kankadalwar : अहेरीमध्ये आदिवासी विद्यार्थी संघटनेने बाजार समितीवर कब्जा केला आहे.
Dharmraobaba Atram, Ajay Kankadalwar and Ambrishrao Atram
Dharmraobaba Atram, Ajay Kankadalwar and Ambrishrao AtramSarkarnama

Gadchiroli District APMC Elections Results Analysis : राज्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांची भूमिका महत्वाची असते. ते राज्याचे मंत्री राहून चुकलेले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये त्यांचा जलवा बघायला मिळेल, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांना होती. पण त्यांच्याच अहेरीमध्ये आदिवासी विद्यार्थी संघटनेने बाजार समितीवर कब्जा केला आहे. (In Aheri, tribal students' organization has captured the market committee.)

धर्मरावबाबांसाठी हा धक्का मानला जात आहे. असे असले तरीही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका बाबांनी गांभीर्याने घेतल्याच नव्हत्या. या निवडणुकांच्या दरम्यान ते विदेशात गेलेले आहेत. बाबा येथे असते तर निकाल काही और लागले असते, असे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे. पण आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढण्यासाठी जोरबैठका काढणारे धर्मरावबाबा बाजार समितींच्या निवडणुकांकडे दुर्लक्ष कसे काय करू शकतात, याचे उत्तर मात्र त्यांच्या कार्यकर्त्यांकडे नाही.

चार्मोशीमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अतुल गण्यारपवार यांच्या गटाने १८ पैकी १२ जागांवर बाजी मारली. गण्यारपवार हे अपक्ष आहेत. उर्वरित सहा संचालकांमध्ये कॉंग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार आहेत. वास्तविक पाहता या निवडणुकीत कॉंग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादी या गटाकडे जास्त मते होती आणि ती मिळणारच असा विश्‍वास त्यांना होता.

त्या पक्क्या मतदारांना शिर्डी दर्शनही घडवण्यात आले. पण गोंधळ कुठे झाला, हे मात्र कळले नाही. पण येथे एक सांगितले पाहिजे की, भाजपचे विद्यमान आमदार देवराव होळी गण्यारपवार यांचे अभिनंदन करायला स्वतः गेले होते. यामागे काय घडले किंवा घडत आहे, याचा शोध आता राजकीय वर्तुळात घेतला जात आहे.

Dharmraobaba Atram, Ajay Kankadalwar and Ambrishrao Atram
Gondia District APMC Analysis : गोंदियात डॉ. परिणय फुकेंनी पटेलांच्या साथीने नाना पटोलेंना दिली मात !

आजपर्यंतच्या इतिहासात दोन राजे (राजे धर्मरावबाबा आत्राम आणि राजे अंबरीशराव आत्राम) एकत्र आले नाहीत. पण या निवडणुकीत तो चमत्कार झाला आणि अहेरी बाजार समितीसाठी दोन राजे एकत्र आले. याशिवाय माजी आमदार आणि कधी काळी आदिवासी विद्यार्थी संघटनेसोबत असलेले दीपक आत्राम यांनीही दोन राजांना छुपा पाठिंबा दिला होता, अशी माहिती आहे.

निकालांमध्ये चमत्कार बघायला मिळेल, अशी आस कार्यकर्त्यांना लागलेली होती. पण तसे होऊ शकले नाही. येथे अजय कंकडालवार यांच्या आदिवासी विद्यार्थी संघटनेने ११ जागांवर विजय मिळवला, तर दोन राजे आणि एका माजी आमदाराला जिवाचा आटापिटा करूनही केवळ आठ जागांवर समाधान मानावे लागले.

Dharmraobaba Atram, Ajay Kankadalwar and Ambrishrao Atram
Washim District APMC Analysis : भाजपने देशमुखांमुळे राखले रिसोड, बाकी सर्वत्र कॉंग्रेस-राष्ट्रवादीच !

सिरोंचामध्येही आदिवासी विद्यार्थी संघटनेने आपला जलवा दाखवला. दीपक आत्राम तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्यासोबत बीआरएसमध्ये गेल्यानंतर आविसंचे कर्तेधर्ते आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार हे सिरोंचातही एकटे लढले. येथे त्यांनी कडवी झुंज देत १८ पैकी नऊ जागा काबीज केल्या. आता येथे सभापतिपदासाठी रस्सीखेच होईल, फोडाफोडीचे राजकारण होईल, असे वाटले होते. पण सद्यःस्थितीत तरी तशी परिस्थिती नाहीये. येथे इश्‍वरचिठ्ठीने सभापतीची निवड होणार आहे.

गडचिरोली जिल्ह्यात एकूण पाच बाजार समितींच्या निवडणुका झाल्या. त्यामध्ये आरमोरी आणि गडचिरोली बाजार समितींवर भाजपप्रणीत प्रकाश पोरेड्डीवार पॅनल निवडून आले. भाजप-शिंदे गटाने ही निवडणूक लढली आणि दोन्ही बाजार समित्या एकहाती जिंकल्या. आरमोरीतल्या १८ च्या १८ जागांवर भाजप-शिंदे गटाचे संचालक आहेत. गेल्या ५० वर्षांपासून प्रकाश पोरेड्डीवार यांचा राजकारणात दबदबा आहे, तो आताही कायम असल्याचे त्यांनी दाखवून दिले.

Dharmraobaba Atram, Ajay Kankadalwar and Ambrishrao Atram
Akola APMC Election Analysis : राष्ट्रवादी काँग्रेस - काँग्रेसला तोड मिळाला, वंचितचा सहकारात शिरकाव !

गडचिरोलीतही (Gadchiroli) पोरेड्डीवार गटाने जागांवर विजय मिळवला. विरोधात लढलेल्या महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) येथे एकही जागा जिंकता आली नाही. कॉंग्रेसचे (Congress) जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, माजी आमदार नामदेव उसेंडी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) जिल्हाध्यक्ष रवी वासेकर यांच्यावर आत्मपरीक्षण करण्याची वेळ या निकालांनी आणली. धर्मरावबाबांनी लोकसभा लढण्याची पूर्ण तयारी केलेली आहे. प्रसंगी पक्ष बदलवूनही ते लोकसभा लढवू शकतात, अशी सूत्रांची माहिती आहे. कदाचित त्यामुळेच त्यांनी या निवडणुकांमध्ये रस घेतला नसावा.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com