Nitin Gadkari Sarkarnama
विदर्भ

Nitin Gadkari : विमानतळाच्या कामासाठी मीच ‘सुपरवायझर'..., नितीन गडकरींनी अधिकाऱ्यांना भरला दम

Rajesh Charpe

Nagpur News, 09 Oct : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) बिनधास्त आणि बेधडक बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. कधी कधी विनोदाने ते आपल्याच पक्षाला चिमटे काढतात. लाडकी बहीण योजनेवर परखड मत व्यक्त करून त्यांनी आपल्याच सरकारला अडचडणीत आणले आहे.

ती त्यांची बोलण्याची स्टाईल आहे, असे सांगून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीची बाजू सावरावी लागली. अधिकार्‍यांनाही खडेबोल सुनावण्यात गडकरी मागेपुढे पाहात नाही. अशातच बुधवारी त्यांनी नागपूर विमानतळाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्यावेळी मी रोज कामावर सुपरवायझर सारखं लक्ष ठेवणार असल्याचे सांगितलं.

त्यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, विमानतळ प्राधिकरणाचे अधिकारी तसेच विकासक चांगलेच टेंशनमध्ये आले आहेत. नागपूर (Nagpur) विमानतळाला आंतराष्ट्रीय दर्जा प्राप्त झाला आहे. विकासासाठी राज्य शासनाने टेंडर काढले होते. मात्र त्यास कोर्टात आव्हान देण्यात आले होते. त्यामुळे साडेतीन वर्षांपासून काम रखडले होते. आता सुप्रिम कोर्टाने निकाल दिल्यानंतर विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.

बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रामुख्याने उपस्थित होते. फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) भाषणाचा हवाला देऊन गडकरी यांनी आपल्या भाषणात धडाकेबाज बॅटिंग केली. मी रोज विमानतळाच्या प्रत्येक कामावर सुपरवायझर सारखं लक्ष देणार आहे.

विमानतळाच्या विकासामुळे येथून नऊ लाख टन कार्गो निर्यात होईल. विकासात याचा मोठा फायदा होईल. ताडोबा जंगल सफारीसाठी दुरदुरून लोक विदर्भात येतात. त्यामुळे आठ ते दहा चांगले आर्किटेक निवडा. प्रेझेंटेशन घ्या आणि त्यातून एक डिझाईन सिलेक्ट करा. अजनी रेल्वे स्टेशनच काम गतीने सुरू आहे.

ड्रायपोर्ट येथे सुरू झाल्यामुळे एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट इथून सुरू करता येणार आहे. एम्स, आयएम, सिम्बॉयसिस युनिव्हर्सिटी आता नागपूर एअरपोर्ट हे विदर्भासाठी ग्रोथ इंजिन म्हणून उदयास येईल. विदर्भातील शेतकऱ्यांनी तयार केला बायो इंधनावर येथून विमान उडावे यासाठी आपण प्रयत्न करीत असल्याचंही नितीन गडकरी यांनी सांगितलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT