Nitin Gadkari
Nitin Gadkari 
विदर्भ

नितीन गडकरींना मिळणार मोठी जबाबदारी? भाजप नेत्याने स्पष्टचं सांगितलं...

सरकारनामा ब्युरो

नागपूर : पक्षामध्ये जबाबदाऱ्यांचे वाटप एकाच दिवशी होत नाही. तर वेगवेगळ्या दिवशी योग्य वेळी केली जाते. विरोधी पक्षांकडून नितीन गडकरी यांना डावलले गेल्याचा अपप्रचार होत आहे. तो खोटा आहे. मलासुद्धा डावलले गेले असा अपप्रचार एकेकाळी करण्यात आला होता. पण पक्षाने योग्यवेळी माझ्यावर जबाबदारी टाकलेली आहे, अशी प्रतिक्रीया भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule) यांनी दिली.

भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीतून केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांना वगळण्यात आले. त्यांच्या ऐवजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्थान देण्यात आले आहे. यामुळे भाजपमध्ये नितीन गडकरींना केंद्रीय पातळीवर डावललं जातंय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. या चर्चांवर प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी जरी नितीन गडकरी यांनी केंद्रीय निवडणूक समितीतून वगळले असले तरी गडकरींसाठी त्यांच्या डोक्यात नक्कीच काहीतरी चांगले विचार असतील. त्यांनी गडकरींसाठी नक्कीच आणखी मोठ्या पदांचा विचार केला असेल.

मंत्रिमंडळातील खातीवाटप आणि पुढील मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाला कोणते खाते द्यायचे. हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठरवतील. तो संपूर्ण अधिकार एकनाथ शिंदे यांचा आहे. गेली अडीच वर्षे महाविकास आघाडीचे सरकार होते. पण आता शिंदे फडणवीस यांचे बुलेट ट्रेन च्या स्पीडचे सरकार आलेले आहे. मागील वाया गेलेले अडीच वर्ष आणि येणारा कालावधी, असे एकूण पाच वर्षांची कामे हे सरकार दोन वर्षात करेल, असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT