सोलापूर : तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी वर्षा बंगल्यावर सर्व आमदारांना चहापानासाठी बोलावून घेतले हेाते. तुमच्यापैकी कोणाला मुख्यमंत्री व्हायचं असेल तर मी खुर्ची सोडायला तयार आहे, असे ठाकरे यांनी त्यावेळी म्हटले होते. पण, गुलाबराव पाटलांसह उपस्थित सर्व आमदारांनी ‘आम्ही तुमच्यापासून (शिवसेना) दूर जाणार नाही,’ अशी शपथ घेतली होती. मात्र, दुसऱ्याच दिवशी गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) आणि इतर आमदार गुवाहाटीला पळून गेले, असा टोला शिवसेनेचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना लगावला. (Gulabrao Patil, who took oath at Varsha Bungalow, fled to Guwahati the very next day : Vinayak Raut)
मी वीस आमदार घेऊन उद्धव ठाकरे यांना भेटायला गेलो होतो. त्यावेळी तह झाला असता, तर पुढील गोष्टी घडल्या नसत्या. मी गुवाहाटीला सांगून गेलो होतो, पळून गेलो नव्हतो. त्यामुळे आम्हाला गद्दार म्हणू नका, असे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटले हेाते. त्यावरून खासदार राऊतांनी पाटलांना टोला लगावला.
विनायक राऊत म्हणाले की, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या बोलण्यात काही तथ्य नाही. ज्यावेळी आमदारांनी उद्धव ठाकरेंच्या भेटीची वेळ मागितली होती, त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी या सर्व आमदारांना चहापानासाठी वर्षा बंगल्यावर बोलावून घेतलं होतं. अगदी मनमोकळेपणाने त्यांच्याशी चर्चा केली होती. त्यावेळी त्यांनी तुम्हाला नेमकं काय हवं आहे,? असेही विचारले होते.
तुमच्यापैकी कोणाला मुख्यमंत्री व्हायचं असेल तर मी खुर्ची खाली करायला तयार आहे. असंसुद्धा उद्धव ठाकरे त्यावेळी म्हणाले होते. अत्यंत मनमोकळी चर्चा त्यावेळी आमदारांनी केली होती. त्यावेळी उपस्थित असलेल्या गुलाबराव पाटलांसहीत सर्व आमदारांनी ‘कोणत्याही परिस्थितीत आम्ही तुमच्यापासून (शिवसेनेपासून) दूर जाणार नाही,’ अशी शपथ घेतली होती. मात्र, दुसऱ्याच दिवशी गुलाबराव पाटील आणि बाकीचे आमदार पळून गेले, असं म्हणत शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांचा कडक शब्दांत समाचार घेतला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.