3rd Term of Modi Government Sarkarnama
विदर्भ

Modi Government: नितीश कुमार, चंद्राबाबू 'एनडीए'ची साथ सोडणार, मोदी सरकार कोसळणार? 'या' नेत्याचा खळबळजनक दावा

Congress Political News : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत विदर्भात काँग्रेस-मविआला जनतेने चांगली साथ दिली.आगामी विधानसभा निवडणुकीतही लोकसभेपेक्षाही चांगलं साथ देतील असा विश्वासही चव्हाण यांनी व्यक्त केला.याचवेळी त्यांनी भाजप, महायुती सरकारला घालवल्याशिवाय जनता शांत बसणार नसून त्यांना 100 जागाही मिळणार नाही असेही त्यांनी सांगितले.

Deepak Kulkarni

Gondia News : चारशे पार चा नारा दिलेल्या भाजपला लोकसभा निवडणुकीत स्वत:ला बहुमताचा आकडा गाठणंही शक्य झालं नाही. शेवटी नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्यासह एनडीएतील घटक पक्षांसह भाजपला सत्तास्थापन करावी लागली.या सरकारच्या कार्यकाळाबद्दल शंका उपस्थित केली जात आहे.

पण तेव्हापासून काँग्रेससह इंडिया आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेतेमंडळींकडून केंद्रातील मोदी सरकार कोसळणार असल्याच्या विधानं करण्यात येत असतात. भाजपकडून हा दावा फेटाळून लावतानाच एनडीए सरकार आता मजबूत असल्याचा दावा ठोकला जातो. अशातच आता पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांनी मोदी सरकार (Modi Government) लवकरच कोसळणार असल्याचं भाकित करत खळबळ उडवून दिली आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांच्या उपस्थितीत गोंदियाचे माजी आमदार आणि भाजप नेते गोपाल अग्रवाल यांनी पक्षाला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी चव्हाण यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे त्यांच्या रोखठोक विधानांसाठी ओळखले जातात.आता त्यांनी मोदी सरकारबाबत मोठं विधान केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची खुर्ची डळमळीत असून वाजपेयी सरकारच्या 13 महिन्यांच्या सरकारची पुनरावृत्ती होईल असं चव्हाण म्हणाले आहेत.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत विदर्भात काँग्रेस-मविआला जनतेने चांगली साथ दिली.आगामी विधानसभा निवडणुकीतही लोकसभेपेक्षाही चांगलं साथ देतील असा विश्वासही चव्हाण यांनी व्यक्त केला.याचवेळी त्यांनी भाजप, महायुती सरकारला घालवल्याशिवाय जनता शांत बसणार नसून त्यांना 100 जागाही मिळणार नाही असेही त्यांनी सांगितले.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी महायुती सरकारवर चांगलाच हल्ला चढवला होता. तसेच यावेळी त्यांनी राजकीय अनुभव आणि मिळालेल्या माहितीनुसार, इथल्या सरकारबाबत गेल्या 10 वर्षांची जी अँटी इन्कबन्सी आहे.ती कमी करण्यासाठी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याची शक्यता आहे, असा दावा चव्हाण यांनी केला आहे.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, आमचं आकलन असं आहे की, कोणत्याही परिस्थितीत सत्ताधारी महायुतीतील घटक पक्ष निवडणूक वाचवू शकत नाहीत. तर एक मार्ग आहे की,राष्ट्रपती राजवट राबवायची.

आता निवडणूक घेतली तर आपला पराभव निश्चित आहे, असं जर या सत्तेतील पक्षांना जर वाटत असेल आणि राज्यातल्या सरकारबाबत जी 10 वर्षांची अँटी इन्कबन्सी आहे. ती कमी करण्यासाठी येथे राष्ट्रपती राजवट लावून काहीतरी करुन काहीतरी चांगलं होईल याविषयी आशावादी राहायचं, असा विचार सत्ताधारी पक्ष करु शकतात असं वक्तव्य काँग्रेस नेते चव्हाण यांनी केलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT