Video Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी सरकारचा 'मेगा प्लॅन' तयार, निवडणुकीआधी होणार घोषणा?

Maratha Reservation Eknath Shinde : मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील 16 सप्टेंबरपासून पुन्हा उपोषण सुरू करणार आहेत. तसा इशारा त्यांनी राज्य सरकारला दिला आहे.
Maratha Reservation   Manoj Jarange Patil
Maratha Reservation Manoj Jarange PatilSarkarnama
Published on
Updated on

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी झालेल्या आंदोलनाचा फार मोठा फटका महायुतीला बसला. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे, हैद्राबाद गॅझेट लागू करावे अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली होती. ते या मागण्यांवर ठाम आहेत.

विधानसभा निवडणुकीत मराठा आंदोलनाचा फटका बसू नये म्हणून राज्य सरकार अॅक्शन मोडवर आहे. सरकारने आरक्षणासाठी हैद्राबाद गॅझेट लागू करण्याचा मेगा प्लॅन तयार केला असल्याचे वृत्त 'साम टिव्ही'ने दिले आहे.

सरकार हैद्राबाद गॅझेट लागू करण्याचा तयारी असून त्यासाठी महिना अखेर 25 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीत एक दिवसाचे अधिवेशन सरकार बोलवण्याची तयारी करत असल्याचे 'साम'ने आपल्या वृत्तात म्हटले आहे.

Maratha Reservation   Manoj Jarange Patil
Vaibhav Naik : 'सरकारकडून जयदीप आपटेला अभय', ठाकरेंच्या शिलेदाराचा गंभीर आरोप

मराठा-कुणबी नोंदी तपासण्यासाठी मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर सरकारने शिंदे समितीची स्थापना केली होती. या समितीवर मराठा कुणबी नोंद शोधण्याचे काम देण्यात आले होते. तसेच हैद्राबाद येथील गॅझेट देखील समितीकडून तपासण्यात येत होते.

हैद्राबाद गॅझेट लागू करावे, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली होती. ती मागणी राज्य सरकार मान्य करून मराठा आरक्षणासाठी मोठे पाऊल निवडणुकीच्या आधी उचलणार आहे.

जरांगे उपोषणाच्या तयारीत

राज्य सरकारकडून मराठा आरक्षणासाठी कुठल्याही हालचाली होत नसल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील 16 सप्टेंबरपासून पुन्हा उपोषण सुरू करणार आहेत. 16 सप्टेंबरला मध्यरात्रीपासून आप उपोषण सुरू करणार असल्याचा इशारा देखील मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे.

Maratha Reservation   Manoj Jarange Patil
Mahayuti News : विदर्भात महायुतीला मोठा धक्का? सर्व्हेमध्ये कोणत्या पक्षाला मिळणार किती जागा ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com