Lok Sabha Election 2024 in Gondia Sarkarnama
विदर्भ

Lok Sabha Election 2024 : यंदाच्या निवडणुकीत महिलाच ठरणार ‘किंगमेकर’

Gondia Constituency : पाच लाखावर महिला मतदार निवणार आपल्या पसंतीचा खासदार. प्रत्येक मताला राहणार मोलाचे महत्व.

अभिजीत घोरमारे

Lok Sabha Election 2024 : निवडणुकीत प्रत्येक मताला महत्व आहे. एका मतानेही सत्तेचा सारीपाट विस्कटून जातो. याचा प्रत्यय निवडणुकीत कित्येकदा आला आहे. त्यामुळे एक मत नशीब उजळू शकते किंवा सत्तेपासून दूर नेऊ शकते. याच कारणांमुळे उमेदवारांकडून मतदारसंघातील सर्वच मतदारांचा मत रूपी आशीर्वाद घ्यावा लागतो. आता लोकसभा निवडणूक असो अथवा विधानसभा दोन्ही निवडणुकीत उमेदवारांना मात्र मातृशक्तीचाच आशीर्वाद तारणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवाराकडून महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध उपाय करण्यात येत आहेत. यासाठी खास आराखडा प्रत्येक पक्षांकडून तयार केला जात आहे.

लवकरच लोकसभेची निवडणूक होणार आहे. सर्वांच्या नजरा आदर्श आचारसंहितेकडे लागून आहेत. निवडणुकीला घेऊन उमेदवारांसोबत जिल्हा प्रशासनसुद्धा कामाला लागले आहे. गोंदिया जिल्ह्याची अंतिम मतदार यादीसुद्धा प्रसिद्ध झाली आहे. मतदार यादीनुसार जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघांना घेऊन एकूण 10 लाख 82 हजार 272 मतदार मतदानाचा हक्क बजावू शकतील. यात 5 लाख 37 हतार 969 पुरुष तर 5 लाख 47 हजार 293 महिला मतदार आहेत. गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव व गोंदिया विधानसभा मतदारसंघात पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या जास्त आहे. त्यात 9 हजार 889 महिला मतदार अधिक आहेत. ही आकडेवारी बघता आमगाव व गोंदिया विधानसभा मतदारसंघात महिलाच ‘किंगमेकर’ दिसून येत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गोंदिया जिल्ह्याची आकडेवारी झाली असली तरी विधानसभा मतदारसंघनिहाय पाहिल्यास तिरोडा व गोंदिया विधानसभा मतदारसंघात महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांच्या तुलनेत जास्त आहे. तिरोडा विधानसभा मतदारसंघात 1 लाख 29 हजार 367 पुरुष तर 1 लाख 33 हजार 296 महिला मतदार आहेत. 3 हजार 929 महिला मतदार जास्त आहेत. गोंदिया विधानसभा मतदारसंघात 1 लाख 51 हजार 508 पुरुष तर 1 लाख 57 हाजर 468 महिला मतदार आहेत. 5 हजार 960 महिला मतदार येथे अधिक आहेत. दोन्ही विधानसभा मतदारसंघात 9 हजार 889 अधिक महिला मतदार आहेत.

पुरुषांच्या तुलनेत अगोदरच महिला मतदारांची संख्या 9 हजार 324 एवढी जास्त असून गोंदिया जिल्ह्यात महिला राजकारणातील महत्वाचा फॅक्टर ठरणार आहेत, यात शंका नाही. अशात मात्र आता तिरोडा व गोंदिया विधानसभा मतदारसंघात महिलांची संख्या जास्त असल्याने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांना महिलांचा आशीर्वादच राजयोग घडवून देणारा ठरणार आहे.

Edited By : Prasannaa Jakate

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT