Nagpur Division Teacher Constituency
Nagpur Division Teacher Constituency Sarkarnama
विदर्भ

‘पदवीधर’मध्ये चालले ओबीसी कार्ड, आता भाजपचा जोर ओबीसीवर, पण उमेदवार महिला !

Atul Mehere

नागपूर : नागपूर (Nagpur) विभाग शिक्षक मतदारसंघासाठी जवळपास सर्वच संघटनांनी उमेदवार जाहीर केले आहेत. मात्र भाजपने आपल्या उमेदवाराचे अद्यापही गुलदस्त्यात ठेवले आहे. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत कॉंग्रेसने ओबीसी कार्ड खेळत अख्खी निवडणूकच धुऊन नेली आणि भाजपचा बालेकिल्ला उद्ध्वस्त केला. आता भाजपला रिस्क घायची नाहीये. त्यामुळे भाजपही या निवडणुकी ओबीसी कार्ड खेळणार आहे. उमेदवार घोषित झालेला नसला तरी ती महिला असणार, अशी सूत्रांची माहिती आहे.

भाजपकडून (BJP) यावेळी ओबीसी (OBC) महिलेला संधी दिली जाणार असल्याचे जवळपास निश्चित केले आहे. त्यामुळे भाजप समर्थीत इच्छुक उमेदवारांतील इच्छुक महिला कोण, याचा कयास लावला जात आहे. भाजप समर्थीत महाराष्ट्र (Maharashtra) शिक्षक परिषदेचे आमदार नागोराव गाणार यांचा दुसरा कार्यकाळ संपुष्टात येत आहे. निवडणूक आयोगाने (Election मतदार नोंदणीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार जानेवारी २०२३ मध्ये ही निवडणूक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सर्वच इच्छुकांनी यासाठी तयारी सुरू केली आहे. ७ नोव्हेंबरपर्यंत मतदारांची नोंदणी करायची आहे. काही संघटनांनी आपले उमेदवार जाहीर केले आहे. यात फुले शाहू आंबेडकर अध्यापक परिषदेने साहित्यिक प्रा. दीपककुमार खोब्रागडे, ओबीसी, फुले शाहू आंबेडकरी संघटनेच्यावतीने सुषमा भड, विदर्भ मुख्याध्यापक संघाने सतीश जगताप यांची नावे जाहीर केली आहे. काँग्रेसचे (Congress) समर्थन मिळवण्सायाठी शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे दबाव गट तयार करीत आहेत.

भाजपने मराठवाड्यात आपल्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली आहे. सोबतच पक्षाच्या चिन्हावर शिक्षक आमदार मतदारसंघाची निवडणूक लढणार असल्याचेही जाहीर केले आहे. मात्र नागपूर विभागाचा निर्णय राखून ठेवला आहे. आमदार नागोराव गाणार पुन्हा लढण्यास इच्छुक आहेत. महाराष्ट्र शिक्षक परिषदेने त्यांच्याच नावाचा प्रस्ताव पाठवला आहे. मात्र तो त्यांनीच पाठविल्याचा दावा त्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांचा आहे. भाजपच्या नेत्यांनी त्यांना उमेदवारी देणार नसल्याचे स्पष्टपणे कळविले असल्याचे माहिती सूत्रांनी दिली.

कल्पना पांडे, कन्नाटेही इच्छुक..

माजी महापौर व नागपूर विद्यापीठ शिक्षण मंचच्या अध्यक्ष कल्पना पांडे यासुद्धा इच्छुक आहेत. महापालिकेचे शिक्षक राजू कन्नाटे भाजपच्या अनेक बड्या नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. त्यांनी आपण ही निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले आहे. शहरातील सर्वच नेत्यांसोबत त्यांचा संपर्क आणि उत्तम संबंध आहे. मात्र भाजपला पदवीधरची पुनरावृत्ती होऊ द्यायची नसल्याने अतिशय काळजी घेतली जात आहे. हे पाहता ओबीसी कार्ड खेळले जाणार असून एखाद्या उच्चशिक्षित महिलेला उमेदवारी महिलेवर डाव खेळणार असल्याचे समजते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT