Nagpur ‘शिक्षक’ निवडणूक : मतदार नोंदणी फक्त चार हजार, शिक्षक भारती घेणार पुढाकार!

त्यामध्येही एक ना अनेक अडचणी प्रशासनाकडून समोर केल्या जात आहेत. परिणामी आतापर्यंत नागपूर (Nagpur) जिल्ह्यात फक्त चार हजार मतदारांची नोंदणी झाली आहे.
Nagpur Teachers Constituency
Nagpur Teachers Constituency Sarkarnama

Nagpur Teachers Constituency नागपूर : नागपूर शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. राजकीय पक्षांमधील (Political Parties) हालचाली सध्या संथ असल्या तरी संघटनांचे कार्यकर्ते ॲक्टीव मोडवर आले आहेत. यावेळी मतदारांची नोंदणी प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून केली जात आहे. त्यामध्येही एक ना अनेक अडचणी प्रशासनाकडून समोर केल्या जात आहेत. परिणामी आतापर्यंत नागपूर (Nagpur) जिल्ह्यात फक्त चार हजार मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यामुळे आता शिक्षक भारतीने याकामी पुढाकार घेतला आहे.

शिक्षक भारती संघटनेचे राज्य उपाध्यक्ष राजेंद्र झाडे यांच्या नेतृत्वात उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनल कळसकर व तहसील निवडणूक अधिकारी राहुल सारंग यांची भेट घेण्यात आली. यावेळी त्यांनी नागपूर जिल्ह्यात किती शिक्षक (Teacher) मतदारांचे अर्ज गोळा झाले आणि नोंदणी झाली याचा तपशील घेतला. उपजिल्हा निवडणूक अधिकारी कळसकर यांनी सांगितले की, जिल्ह्यातील ४ हजार शिक्षक मतदारांची नोंदणी झाली. यापूर्वी १८ ऑक्टोबरला विभागीय कार्यवाह प्रा. सपन नेहरोत्रा जिल्हा कार्यवाह दीपक नागपूरे, यांनी उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांची भेट घेत शिक्षकांना नोंदणी अर्ज सादर केले होते.

त्यांनी तालुकास्तरावरील अडचणी व प्रशासकीय अनास्था दर्शवली होती. यावेळी नोंदणीबद्दल विचारले असता त्यांनी जिल्ह्याची मतदार नोंदणी १ हजार १६३ ने कमी झाल्याचे मान्य केले होते. शिक्षक भारती संघटनेचे राज्य उपाध्यक्ष राजेंद्र झाडे यांनी मतदारांची नोंदणीची गती फारच संथ असून जास्तीत जास्त मतदार नोंदणीसाठी शिक्षक भारती संघटनेच्या वतीने पुढाकार घेऊन जागरूकता निर्माण करणार असल्याचे सांगितले.

Nagpur Teachers Constituency
शिक्षक मतदारसंघ निवडणूक : शिक्षक भारतीने नाना पटोलेंना करून दिली ‘ती’ आठवण !

प्रशासनाला मदत म्हणून कोणताही आणि कुठल्याही विभागात कार्यरत शिक्षक किंवा प्राध्यापक नोंदणीपासून वंचित राहू नये, यासाठी प्रयत्न करण्याचा मानस व्यक्त केला. बैठकीत अनंता पानबुडे, महेंद्र बनसिंगे, प्रवीण फाळके, नरेश पन्नासे, सुधाकर ठाकरे, जगदीश राऊत, शरद काकडे, विठ्ठल वांगे, नंदकिशोर कातुरे, राजू यावलकर, प्रमोद शिंगणापुरे, अभय बुध्दे, राजू भिवगडे, विठ्ठल जिचकार उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com