OBC census column Sarkarnama
विदर्भ

OBC census column : जनगणनेत 'OBC'चा रकाना गायब; वडेट्टीवारांचा केंद्राविरोधात एल्गार!

Congress Vijay Wadettiwar slams the Modi government during an absence of a separate OBC column in the census : जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकाना नसल्यावरून काँग्रेस विधिमंडळाचे नेते विजय वडेट्टीवार यांना केंद्र सरकारविरोधात एल्गार पुकारला आहे.

Pradeep Pendhare

OBC protest Nagpur : केंद्र सरकार 2027 मध्ये भारताची पहिली डिजिटल जनगणना करणार असून, त्यासाठी 11718 कोटी रुपयांच्या बजेटला मंजुरी देखील देण्यात आली आहे. या प्रक्रियेत एप्रिल-सप्टेंबर 2026दरम्यान घरांची यादी आणि गणना होईल. यात प्रथमच जातीनिहाय गणनेचा समावेशाची शक्यता आहे.

ही जनगणना 2029च्या लोकसभा जागांच्या पुनर्वितरणासाठी आधार ठरेल. परंतु या जनगणनेत ओबीसींवर अन्याय होतोय, अशी भावना व्यक्त केली जात आहे. जनगणेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकानाच नाही. हा अन्याय आहे, असा घणाघात काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला.

केंद्र सरकारच्या सूचनेनुसार होत असलेल्या जनगणनेत ओबीसींसाठी (OBC) स्वतंत्र रकाना नसल्याने ओबीसींवर अन्याय आहे. याविरोधात नागपूरच्या संविधान चौकात ओबीसी नेत्यांनी जोरदार धरणे आंदोलन केले. विधानसभेचे काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात ओबीसी समाजाच्या हक्कासाठी एल्गार पुकारण्यात आला.

देशात 2027पासून डिजिटल जनगणना सुरू होत आहे. या डिजिटल अर्जात ओबीसींचा उल्लेख नाही. ओबीसींचा असा स्वतंत्र रकाना नसणे म्हणजे, ओबीसी समाजाचे मोठे नुकसान आहे. हक्क आणि अधिकारांपासून वंचित ठेवण्याचा हा डाव आहे, असे घणाघात विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केला.

विजय वडेट्टीवार यांनी जनगणनेत हा रकाना नसणे, राजकीय दृष्ट्‍या किती घातक आहे, याकडे लक्ष वेधताना, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींच्या अधिकारावर गदा येणारा आहे. त्यामुळे जोपर्यंत स्वतंत्र रकाना समाविष्ट होत नाही, तोपर्यंत ओबीसी संघटनांचे आंदोलन सुरूच राहील, असा इशारा त्यांनी दिला.

ओबीसींचे कैवारी फडणवीस कोठे आहेत

विजय वडेट्टीवार यांनी यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केले. आता मुख्यमंत्री कोठे आहेत? असा सवाल केला. स्वतःला ओबीसींचे कैवारी म्हणवणारे पंतप्रधान आणि राज्यातील मुख्यमंत्री आता कुठे गेले? केवळ बॅनर लावून ओबीसींचे प्रश्न सुटणार नाहीत, तर त्यांना प्रत्यक्ष न्याय मिळणे गरजेचे आहे, असा घणाघात केला.

जनगणनेविरोधात असहकार पुकारणार

सरकारने ओबीसींबाबत विश्वासघात केल्या, तो कदापि सहन करणार नाही. ओबीसींची मागणी मान्य केली नाही, हे आंदोलन गावागावात पेट घेईल, असा इशारा विजय वडेट्टीवार यांनी दिला. ओबीसी रकाना नसल्यास ओबीसी समाज जनगणनेत सहभागी होणार नाही, अशा आशयाचे फलक घराघरासमोर लावून असहकार पुकारला जाईल, असा इशाराही या आंदोलनातून दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT