Devendra Fadnavis And OBC  Sarkarnama
विदर्भ

OBC Mahamorcha: मुख्यमंत्र्यांसोबतच्या उद्याच्या बैठकीवर ओबीसी नेत्यांचा बहिष्कार; नागपुरातील ओबीसींच्या महामोर्चाचं काय होणार?

OBC Mahamorcha: मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण देण्यासाठी हैदराबाद गॅझेटियर लागू झाल्यानंतर ओबीसींमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

Amit Ujagare

OBC Mahamorcha: मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण देण्यासाठी हैदराबाद गॅझेटियर लागू झाल्यानंतर ओबीसींमध्ये अस्वस्थता पसरली आहे. यापार्श्वभूमीवर ओबीसी समाजाच्या बैठकांवर बैठका होत आहेत. येत्या १० ऑक्टोबर रोजी नागपूरमध्ये ओबीसींच्या महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. यापार्श्वभूमीवर उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली एका बैठकीच आयोजन करण्यात आलं आहे. पण या बैठकीवर विदर्भातील ओबीसी नेत्यांनी बहिष्कार घातला आहे. याला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार हे कारणीभूत ठरले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्या बोलावलेल्या ओबीसी नेत्यांच्या बैठकीत विजय वडेट्टीवार यांच्यासोबत आतापर्यंत असणाऱ्या विदर्भातील सकल ओबीसी महामेर्चाचे नेते सहभागी होणार नाहीत अशी माहिती मिळते आहे. कारण मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या आंदोलनादरम्यान हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा जीआर शासनानं काढला होता. या जीआरचं समर्थन केल्यामुळं तायवाडे आणि वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत सहभागी न होण्याचा निर्णय विदर्भातील नेत्यांनी घेतला आहे.

बबनराव तायवाडे यांनी ⁠⁠मराठा समाजासाठी काढलेल्या जीआरमुळं ओबीसी समाजाचं नुकसान होणार नाही, अशी भूमिका घेतली होती. त्यामुळं उद्याच्या बैठकीत न जाण्याचा निर्णय ओबीसी नेत्यांनी घेतला आहे. यामध्ये ज्ञानेश्वर गोरे, ज्ञानेश्वर रायमल, उमेश कोरा⁠⁠⁠म, रमेश पिसे यांच्या बैठकीत हा निंर्णय घेण्यात आला. ओबीसी नेते वडेट्टीवार जर या बैठकीला जाणार असतील तर सकल ओबीसी समाज जाणार नाही, अशी वडेट्टीवार समर्थक सकल ओबीसी माहामोर्चा प्रतिनिधीनी निंर्णय घेतला आहे.

दरम्यान, येत्या १० ऑक्टोबर रोजी नागपूरमध्ये काढण्यात येणाऱ्या महामोर्चात चर्चेसाठी सरकारने आपला प्रतिनिधी पाठवावा. सकल ओबीसी महामोर्चात सरकारच्या या प्रतिनिधींनी भूमिका मांडावी, असा निर्णय ओबीसी नेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळं आता नागपुरात होणाऱ्या महामोर्चाबाबत आता विजय वडेट्टीवार काय भूमीका घेतात याकडं सर्वांच लक्ष लागून राहिलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT