Target Pakistan: ...तर पाकिस्तान भुगोलावर राहणार नाही, लवकरच...; इंडियन आर्मीच्या प्रमुखांचा कडक इशारा

त्याचबरोबर हवाई दल प्रमुखांनी पाकिस्तानबाबत मोठा खळबळजनक दावा केला आहे. ऑपरेशन सिंदुरदरम्यान हवाई दलाची कामगिरी नेमकी काय होती हे त्यांनी सांगितलं.
Army Chief_Air Chief
Army Chief_Air Chief
Published on
Updated on

Target Pakistan: भारत-पाकिस्तानमध्ये ऑपरेशन सिंदूरद्वारे छेडलं गेलेलं युद्ध सध्या थांबवलं आहे पण अद्याप संपलेलं नाही, असं भारतीय सैन्य दलांकडून वारंवार सांगितलं जात आहे. याचीच पुनरावृत्ती नुकतीच लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी केली आहे. राजस्थानच्या अनुपगड इथं बोलताना त्यांनी पाकिस्तानला कडक इशाराही दिला. पाकिस्तानला भुगोलावर रहायचं आहे का? असा सवाल त्यांनी केला आहे. त्याचबरोबर हवाई दल प्रमुखांनी पाकिस्तानच्या लढाऊ विमानांबाबत देखील एक खळबळजनक दावा केला आहे.

जनरल द्विवेदी आपल्या जवानांना संबोधित करताना म्हणाले, "यावेळी भारत संपूर्ण तयारीनिशी सज्ज आहे तसंच ज्या प्रमाणं आपण ऑपरेशन सिंदूर १.० मध्ये जसा संयम ठेवला तसा संयम जर पाकिस्ताननं ठेवला नाही तर यावळी आम्ही पुढची कारवाई करु. ही कारवाईही अशी करु की पाकिस्तानला विचार करावा लागेल की त्यांना इतिहासात भुगोलात राहायचं आहे की नाही. जर त्यांना भुगोलावर आपलं अस्तित्व कायम ठेवायचं असेल तर पाकिस्ताननं देशपुरस्कृत दहशतवाद आपण ज्याला म्हणतो तो म्हणजे दहशतवादाला प्रोत्साहन देणं त्यांनी थांबवलं पाहिजे. त्यामुळं तुम्ही तुमची संपूर्ण तयारी करुन ठेवा. त्यामुळं जर देवाची इच्छा वाहेगुरुंची इच्छा झाली तर लवकरच तुम्हाला संधी दिली जाईल, ऑल दि बेस्ट. जय हिंद."

Army Chief_Air Chief
What Is Electronic Bond : कागदपत्रांचा त्रास संपला; व्यवहार आता पूर्णपणे डिजिटल, काय आहे ई-बॉड प्रणाली!

तर दुसरीकडं भारतीय हवाई दलाच्या ९३ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात घेतलेल्या पत्रकार परिषदेत हवाईदलप्रमुख एअरचीफ मार्शल अमरप्रीत सिंग यांनी देखील ऑपरेशन सिंदूर मोहिमेबाबत मोठा आणि खळबळजनक दावा केला आहे. हवाईदल प्रमुख म्हणाले, पाकिस्तानविरोधात चालवलेलं ऑपरेशन सिंदूर तिन्ही सैन्य दलांच्या ताळमेळाचं प्रतिबिंब होतं, हे जगानं पाहिलं आहे. पहलगाममध्ये जे काही झालं त्यानंतर आपण निर्णय घेतला की, पाकिस्तानला त्यांच्या कृत्याची किंमत चुकवावी लागेल. आम्हाला सरकारनं अगदीच स्पष्टपणे आदेश दिले होते. त्यामुळं इतिहासात ही गोष्ट नोंदवली गेली आहे की, हे एक असं युद्ध होतं जे अगदीच स्पष्ट उद्देशानं सुरु झालं, जे जास्त वेळ न घेता लवकरच समाप्तही केलं गेलं. आपण पाकिस्तानला या परिस्थितीत आणून सोडलं की त्यांनाच युद्धविरामाची मागणी करावी लागली, आपली ही गोष्ट जगानं देखील जरुर शिकायला हवी.

Army Chief_Air Chief
Balasaheb Thackeray: रामदास कदमांच्या दाव्याप्रमाणे खरंच बाळासाहेब ठाकरेंचा मृतदेह 2 दिवस घरी होता? त्यांचा मृत्यू कधी झाला होता अन् घोषणा कोणी केली?

भारतानं एस ४०० एअर डिफेन्स तंत्रज्ञान खरेदी करण्याबाबत लष्कर प्रमुख म्हणाले की, एस ४०० सिस्टिम खूपच उपयोगाची ठरली. यावेळी आपण पाकिस्तानची AWACS आणि ४ ते ५ लढाऊ विमान मोठ्या अंतरावरुन पाडली याचे पुरावे आपल्याकडं आहेत. यामध्ये पाकिस्तानची F-16, JF-17 सारखी अत्याधुनिक विमानांचाही समावेश आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com