Anurag Thakur, Rahul Gandhi Sarkarnama
विदर्भ

OBC Mahasangh On BJP: राहुल गांधींना जात विचारणं चुकीचंच...; ओबीसी महासंघानं भाजपला फटकारलं

Rajesh Charpe

Nagpur News : जातिनिहाय जनगणना आमच्यासाठी महत्त्वाची आहे. आमचा अजेंडाच तो आहे. लोकसभा आणि विविध राज्यांच्या विधानसभेत आता जातनिहाय जनगणनेची होत असलेली मागणी हे आमच्या लढ्याचे यश आहे.

मात्र, यावरून कोणी कोणाची जात काढत असले तर ते चुकीचे आहे असल्याचे राष्ट्रीय ओबीसी (OBC) महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची जात विचारणारे भाजपचे नेते अनुराग ठाकूर यांचा निषेध नोंदवला.

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अधिवेशन पंजाब राज्यातील अमृतसर येथे आयोजित करण्यात आले आहे. याची माहिती देण्यासाठी तायवाडे यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. ते म्हणाले, राष्ट्रीय ओबीसी महासंघात सर्वच राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आहे. ही राजकीय संघटना नाही. महासंघात येताना आपल्या पक्षाचे जोडे बाहेर काढूण यायचे असे आम्ही सुरुवातीपासूनच ठरवले आहे.

सत्ता कोणाचीही असली तरी ओबीसींचे प्रश्न आणि मागण्या मार्गी लावण्याचा आमचा प्रयत्न असतो. त्यासाठी सरकारशी बोलणी आणि चर्चा करत असतो. आमच्यासाठी काँग्रेस (Congress) आणि भाजप दोन्ही पक्ष सारखेच आहेत. त्यामुळे आम्ही कोणालाही समर्थन देत नाही आणि विरोधही करीत नाही असेही तायवाडे यांनी सांगितले.

मनोज जरांगे यांच्या मागणीला तसेच आंदोलनाला आमचा विरोध नाही. प्रत्येकाला घटनेनं आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करण्याचा अधिकार दिला आहे. जरांगे मराठा समाजासाठी आरक्षण देण्यासाठी लढा देत आहे. आम्ही ओबीसींच्या आरक्षणासाठी व त्यांच्या हक्कासाठी लढा देत आहोत. राज्य शासनाने आम्हाला ओबीसींमधून मराठ्यांना आरक्षण देणार नाही असा शब्द दिला आहे. ते आपल्या शब्दावर ठाम आहेत.

सग्या सोयऱ्यांना ओबीसी प्रमाणपत्र देण्यास आमचा विरोध आहे. आमचा लढा जरांगे यांच्यासोबत नाही. जरांगे आणि राज्य सरकार यांच्यात संघर्ष सुरू आहे. आमच्यासोबत त्यांचा लढा सुरू नसल्याने या संघर्षात आम्हाला पडण्याची गरज नाही. ओबीसींच्या आरक्षणावर संकट आले तर आम्ही निश्चित पुढाकार घेऊ, आंदोलन करू, सरकारसोबत संघर्षसुद्धा करू असेही बबनराव तायवाडे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT