Congress News : महायुती सरकारला जनता कंटाळली; काँग्रेसच्या नेत्याने केली टीका

Congress Vs. Bjp politics News : ज्याला काँग्रेसने मोठं केले ते आमदार जयकुमार गोरे हे भाजपमध्ये गेले. त्यामुळे येत्या काळात गद्दाराला गाडण्यासाठी कामाला लागा, असे आवाहन रणजितसिंह देशमुख यांनी केले.
Sarkarnama
Sarkarnama Jaykumar Gore, Ranjitsinh Deshmukh
Published on
Updated on

रुपेश कदम

Maan Congress News : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठे यश मिळाले. त्यामुळे आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीची तयारी आतापासूनच काँग्रेसने सुरु केली आहे. त्यासाठी गावोगावी जाऊन कार्यकर्ते निवडणुकीच्या निमित्ताने मेळावे घेत आतापासूनच आक्रमक पद्धतीने प्रचार करीत आहेत.

ज्याला काँग्रेसने मोठं केले ते आमदार जयकुमार गोरे हे भाजपमध्ये (Bjp) गेले. काँग्रेसचा वापर करुन ते भाजपमध्ये गेले असले तरी त्यांना पराभूत करण्याची संधी आली आहे. त्यामुळे येत्या काळात गद्दाराला गाडण्यासाठी कामाला लागा, असे आवाहन अखिल भारतीय काँग्रेस (Congress) कमिटीचे सदस्य रणजितसिंह देशमुख यांनी केले.

दहिवडी येथे आयोजित माण तालुका काँग्रेस कमिटीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. रणजितसिंह देशमुख म्हणाले, माण मतदारसंघ काँग्रेस विचारसरणीचा असून सर्वांना सोबत घेवून जाणारा काँग्रेस पक्ष आहे. या मतदारसंघात 'हाताचा पंजा' हे चिन्ह मिळावे ही येथील दलित, वंचितांसह सर्वांचीच लोकभावना आहे. त्यामुळे काँग्रेसला हा मतदारसंघ मिळावा ही आमची आग्रही मागणी आहे.

श्रीरंग चव्हाण म्हणाले, 'आम्ही सर्व मतदारसंघात जावून कार्यकर्त्यांचे मनोगत ऐकत आहोत. मते जाणून घेत आहोत. आपण आघाडीच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीला सामोरे जात आहोत. सर्वसामान्यांचा पक्ष असणाऱ्या काँग्रेस पक्षाला चांगले दिवस आणण्यासाठी आपण कामाला लागूया. भाजपने फोडा अन राज्य करा ही निती अवलंबली आहे. या भाजप सरकारला जनता कंटाळली असून हे सरकार हद्दपार करायचं आहे.'

Sarkarnama
BJP Vs Congress : नागपुरात राजकारण पेटलं; फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण, भाजप- काँग्रेसमध्ये जुंपली

डाॅ. सुरेश जाधव म्हणाले, 'कार्यकर्त्यांनी मतदार यादीबाबत सजग राहावे. मतदार यादीतून आपल्या मतदारांचे नाव वगळले जाणार नाही याची दक्षता घ्या. बूथ कमिटीमध्ये सोशल इंजिनिअरिंग राबविले आहे का हे पहा. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार व महायुतीच्या विरोधात वातावरण ढवळून काढावे लागेल. पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठ्यांना टिकणारे आरक्षण दिले होते पण देवेंद्र फडणवीस यांनी ते घालवून टाकले.'

Sarkarnama
Mumbai MVA News : मुंबईत ठाकरेंना काँग्रेसच देणार धक्का; 16 जागांवर इच्छुकांची तयारी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com