Eknath Khadase Sarkarnama
विदर्भ

Eknath Khadse Statement: एक एक आमदार शिंदे गटातून बाहेर पडणार: एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट...

Vidarbha Politics: शिंदे गटातील अनेक आमदारांमध्ये अस्वस्थता आहे.

सरकारनामा ब्युरो

Eknath Khadse News: जशा जशा निवडणुका जवळ येतील, न्यायालयाचा निकाल लागेल, तसा तसा उंदरासाखऱे एक एक आमदार शिंदे गटातून बाहेर पडतील, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadase) यांनी केला आहे.

मंत्रिमंडळाचा विस्तार होत नसल्याने शिंदे गटातील अनेक आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. शिंदे (Eknath Shinde)गटात गेलेले अनेक आमदारामध्ये प्रचंड नाराजी असून ते खासगीमध्ये आपली खद्खद् बोलून दाखवत आहेत. आमदार बच्चू कडू यांनी तर 2024 च्या निवडणुकी नंतरच मंत्री मंडळाचा विस्तार होणार असल्याचं उघडपणे बोलून दाखवले असल्याचही यावेळी खडसे यांनी सांगितलं.

याच वेळी त्यांनी भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावरही भाष्य केलं आहे. बाबरी मशिद पाडली तेव्हा मीही त्यात मी कार सेवक म्हणून सहभागी झालो होतो. पंधरा दिवसांच्या तुरुंगवासासह पोलिसांकडून मारहाण झाली असल्याचेही खडसेंनी सांगितले. तसेच त्या ठिकाणी कोणकोण होतं हे मला माहिती आहे. त्या आंदोलनात शिवसेनेचा जरी अल्प सहभाग होता. तरीही त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी, 'जर बाबरी मशिद माझ्या शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला त्याचा अभिमान आहे'; असं ठणकावून सांगितले. (Maharashtra Politics)

बाबरी मज्जिद आंदोलनात सध्याच्या मंत्रिमंडळापैकी फक्त देवेंद्र फडणवीस या आंदोलनात सहभागी होते.पण आताच्या मंत्रिमंडळातील जवळपास 99 टक्‍के सदस्य नव्हते. असं ही खडसे यांनी यावेळी सांगितलं. मात्र (BJP) भाजपने मात्र यावेळी त्यांची भूमिका ठामपणे मांडली नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT