MP Balu Dhanorkar
MP Balu Dhanorkar Sarkarnama
विदर्भ

३६ सोसायटींवर आपले अध्यक्ष, उपाध्यक्ष म्हणजे सहकार क्षेत्रातील अराजकतेवर विजय...

सरकारनामा ब्यूरो

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा सहकारी बॅंकेवरून वातावरण चांगलेच तापलेले आहे. नोकरभरती करू नये म्हणून कॉंग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांनी लोकसभेत आणि त्यांच्या पत्नी वरोऱ्याच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांनी विधानसभेत आवाज उठविलेला आहे. आज जिल्ह्यातील ३६ सेवा सहकारी सोसायटींवर मिळविलेला विजय हा सहकार क्षेत्रात माजलेल्या अराजकतेच्या विरोधातील विजय आहे, असे खासदार धानोरकर म्हणाले.

सहकार क्षेत्र हे शेतकरी, कामगार वर्गाच्या आर्थिक विकासासाठी आहे. परंतु अलीकडे चंद्रपूर मध्यवर्ती बँकेचे संचालक १० वर्षाच्या कार्यकाळ लोटून देखील केवळ स्वतःच्या आर्थिक लाभासाठी नोकरभरती करीत आहेत. चंद्रपूर (Chandrapur) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत (Bank) अराजकता व गोंधळ उडालेला आहे. या विरोधात मी नेहमी राज्य सरकार, (State Government) केंद्र सरकार व लोकसभेत वेळोवेळी आवाज उठविला आहे. पाठपुरावा देखील करीत आहे. त्यासोबतच न्यायालयीन लढा देखील सुरू आहे, असे खासदार बाळू धानोरकर (MP Balu Dhanorkar) म्हणाले.

भूमिपुत्र सामाजिक संघटनेतर्फे काल ३१ मे २०२२ रोजी दुपारी २ वाजता एन. डी. हॉटेल चंद्रपूर येथे चंद्रपूर व बल्लारपूर तालुक्यातील एकूण ३६ सोसायटींचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालकांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. त्यासोबतच राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्य त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी बाळू धानोरकर बोलत होते. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष ॲड. बाबासाहेब वासाडे, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक माजी अध्यक्ष दादा पाटील चोखारे, संचालक डॉ. अनिल वाढई, माजी संचालक देवानंद गुरू, माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती दिनेश चोखारे यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक हितेश लोडे, संचालन गणेश आवारी यांनी तर आभार रोशन पचारे यांनी केले. सदर कार्यक्रमाला भूमिपुत्राचे प्रभाकर ताजने, निरज बोडे, पवन आगदारी, रमेश बूचे, संतोष बांदूरकर, प्रेमानंद जोगी आसीम शेख, संजय टिपले, भुवन चिने, नामदेव जुनघरे, योगेश बोबडे, सुनील मासिरकर, नंदू टोंगे, रोशन सावे, तुळशीराम देरकर यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT