Aanandacha Shidha Sarkarnama
विदर्भ

Nagpur Administration : ‘सर्व्हर डाउन’च्या समस्येवर मात करत उपराजधानीत घराघरांत पोहोचला आनंदाचा शिधा

Atul Mehere

Nagpur : उत्सवाच्या काळात राज्यातील जनतेला वाटप करण्यात येणाऱ्या शासनाच्या ‘आनंदाचा शिधा’त ‘सर्व्हर डाउन’चं विघ्न येऊ नये, यासाठी नागपूर जिल्हा प्रशासनानं घेतलेल्या पुढाकारामुळं उपराजधानीत ८० टक्क्यांवर शिधा वाटप झालाय. स्थानिक प्रशासनातील अधिकारी, जिल्हा पुरवठा विभाग, अन्नधान्य वितरण अधिकारी, तांत्रिक कर्मचारी आणि स्वस्त भाव दुकानदारांनी सामूहिक प्रयत्नातून हे उद्दिष्ट गाठलंय.

कोणत्याही समस्येविना आनंदाचा शिधा नागपुरातील घराघरांमध्ये पोहोचल्यानं जिल्ह्यातील गोरगरीब जनतेची दिवाळी चांगली होणार आहे. शनिवारी (ता. ११) सायंकाळपर्यंत शिधा वाटपाचं काम पूर्ण होईल, अशी अधिकारी व स्वस्त भाव दुकानदारांना अपेक्षा आहे. सुटीचा दिवस असला तरी शनिवार व रविवार दोन्ही दिवशी नागपुरात हे काम चालणार आहे. (Overcoming the problem of Server Nagpur Administration Achieved the Target of Distribution of Aanandacha Shidna of Maharashtra Government During Diwali)

राज्यातील नागरिकांची दिवाळी सुखात जावी, यासाठी शासनानं आनंदाची शिधा नावाची योजना सुरू केलीय. योजनेतून स्वस्त धान्य दुकानात रवा, साखर, तेल, मैदा, पोहे, चनाडाळ आदी शिधा उपलब्ध करून देण्यात आलीय. या शिधेचं वाटप राज्यभरात करण्यात येते. इंटरनेट जोडणी असलेल्या यंत्राच्या माध्यमातून लाभार्थ्यांना शिधावाटप करण्यात येतेय. अशात एकाच वेळी राज्यभरात वितरण करण्यात येत असल्यानं सरकारच्या ‘सर्व्हर’वर त्याचा भार पडत होता. परिणामी ‘सर्व्हर डाउन’ची समस्या भेडसावण्याची शक्यता होती.

राज्यभरात ८० हजारांवर स्वस्त धान्य दुकानं असल्यानं ‘सर्व्हर डाउन’ झाल्यास किंवा मशिन बंद पडल्यास शिधा वितरणावर त्याचा परिणाम होऊ शकतो, ही बाब नागपूर जिल्हा प्रशासनाच्या लक्षात आली. त्यामुळे पुरवठा विभागानं तांत्रिक कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांचं पथकही नेमलं. अन्नधान्य वितरण अधिकारी विनोद काळे यांनी सांगितलं की, अशा पथकांची नेमणूक करण्यात आल्यानं कुठेही ‘सर्व्हर डाउन’ची समस्या निर्माण झाली नाही. काही ठिकाणी मशिन्समध्ये किरकोळ तांत्रिक बिघाड आलेत, परंतु तातडीनं पथकांनी तेथे पोहोचत मशिनबधील त्रुट्या दूर केल्यानं शिधा वाटप सुरळीत सुरू राहिलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश रेशनिक सेलचे उमाशंकर अग्रवाल यांनीही नागपुरात अधिकाऱ्यांनी घेतलेल्या या पुढाकाराचं कौतुक केलं. अग्रवाल म्हणाले की, नागपुरातील ८० टक्के शिधा वितरण पूर्ण झालय. अंत्योदय कार्डधारक महिलांना साडी मोफत देण्याचा उपक्रमही स्तुत्य आहे. राज्यात आजघडीला ८० हजारांवर स्वस्त धान्य दुकानदार आहेत. त्यांना केवळ १५० रुपये कमिशनपोटी मिळतात. या दुकानदारांपैकी बहुतांश दुकानदार गरीब आहेत. अशा सर्वांचा विचार करीत शासनानं १५० ऐवजी ५०० रुपये कमिशन करीत आम्हालाही दिवाळीची भेट द्यावी.

Edited by : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT