Pankaj Bhoyar on Manoj Jarange Patil Protest sarkarnama
विदर्भ

Maharashtra government : जरांगेंच्या आंदोलनावर सरकारची सौम्य भूमिका? गृहराज्यमंत्री पंकज भोयरही नरमले; कारवाई न करण्याचे संकेत

Pankaj Bhoyar Softens Stand on Manoj Jarange Patil Protest : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचं मुंबईतील आझाद मैदानात उपोषण सुरु आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज (1 सप्टेंबर) चौथा दिवस आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनास विरोधक रसद पुरवत असल्याचा दावा आता उच्च न्यायालयात देखील करण्यात आला आहे.

Rajesh Charpe

Summary :

  1. गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी मनोज जरांगे आंदोलनाबाबत नरमाईची भूमिका घेतली आहे.

  2. आंदोलक गोंधळ घालत असल्याच्या तक्रारी असूनही सरकार कारवाई करणार नाही असे स्पष्ट केले आहे.

  3. रसद पुरवणाऱ्यांना दिलेल्या इशाऱ्यानंतर आता आंदोलकांना दिलासा मिळाला आहे.

Nagpur News : मनोज जरांगे यांना रसद पुरवणाऱ्यांवर सरकारची नजर आहे, असे सांगून संबंधितांना इशारा देण्याचे काम राज्याचे गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी केले होते. ज्यानंतर त्यांच्याविरोधात संताप व्यक्त करण्यात आला होता. यानंतर आता भोयर यांनी आज (1 सप्टेंबर) नरमाईची भूमिका घेतली आहे. मुंबईच्या रस्त्यावर आंदोलक गोंधळ घालत असल्याच्या तक्रारी आल्या असल्या तरी सरकार कोणावरही सध्या कारवाई करणार नाही, असे त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. यावेळी त्यांनी ओबीसी समाजातून सर्व मराठा समाजाला सरसकट आरक्षण देणार दिले जाणार नाही असे आश्वासन ओबीसी महासंघाच्या प्रतिनिधींना त्यांनी दिले आहे.

भोयर यांनी, नागपूरच्या संविधान चौकात सुरू असलेल्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या आंदोलनाला भेट दिली. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या लोकांना सरसकट कुणबी समाजाचे प्रमाणपत्र द्यावे आणि ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे वाद निर्माण झाला आहे. त्यांनी आरक्षण दिल्याशिवाय मुंबई सोडणार नाही असे जाहीर केले आहे. जेलमध्ये टाकले तर आमरण उपोषण सरू करू असा इशारा दिला आहे. त्यामुळे महायुती सरकार चांगलेच पेचात सापडेल आहे.

जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावे यावर युद्धस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. दुसरीकडे मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यात येऊ नये यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्यावतीने महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांच्या नेतृत्वात साखळी उपोषण सुरू आहे. आज उपोषणाचा तिसरा दिवस होता. मनोज जरांगे यांची मागणी सरसकट पूर्ण केली तर आम्हीसुद्धा मुंबईत कूच करू आणि आमरण उपोषण सुरू करू, असा ओबीसी महासंघाने इशारा दिला आहे.

त्यामुळे सरकारसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी सोमवारी महासंघाच्या आंदोलनाला भेट दिली. यावेळी ते म्हणाले आंदोलकांशी सरकारची चर्चा सुरू आहे. ते देखील आपलेच बांधव आहेत. सरकार चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहेत. आंदोलन चिघळणार नाही याची दक्षता घेतली जात आहे. काही आंदोलक मुंबईत गोंधळ घालत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. मात्र सध्या तरी कुठल्याही आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्याची सरकारची मानसिकता नाही असेही गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी स्पष्ट केले. मात्र सरकार म्हणून ओबीसीमधून सरसकट मराठा समाजाला आरक्षण दिले जाणार नाही असे आश्वासन सरकार म्हणून मी देतो असे ओबीसी महासंघाच्या प्रतिनिधींना त्यांनी दिले.

FAQs :

प्र.१. पंकज भोयर यांनी काय सांगितले?
उ. सरकार कोणत्याही आंदोलकांवर सध्या कारवाई करणार नाही असे स्पष्ट केले.

प्र.२. आधी सरकारची भूमिका काय होती?
उ. जरांगे यांना रसद पुरवणाऱ्यांवर सरकारची नजर असल्याचा इशारा दिला गेला होता.

प्र.३. आंदोलकांना याचा काय फायदा होणार?
उ. आंदोलकांना सध्या सरकारकडून तातडीच्या कारवाईपासून दिलासा मिळणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT