Pankaja Munde Sarkarnama
विदर्भ

Pankaja Munde : महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री कोण? पंकजा मुंडेंची आता सावध प्रतिक्रिया, म्हणाल्या...

Maharashtra BJP Politics : विनोद तावडे प्रदेशाध्यक्ष होणार, की नाही याबाबत आपणास माहिती नाही.

Rajesh Charpe

Nagpur Political News : महायुतीच्या कार्यकाळात मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असलेल्या आणि जनतेच्या मनातील मीच मुख्यमंत्री आहे, असे सांगून भाजप नेत्यांचा रोष ओढावून घेतलेल्या पंकजा मुंडे यांनी विधान परिषदेची उमेदवारी मिळताच आपल्या वक्त्यांना आवर घातला असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे विधानसभेत पराभूत झाल्यानंतर पंकजा मुंडे प्रचंड नाराज होत्या.

नागपूरमध्ये महायुतीचा भावी मुख्यमंत्री कोण या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी अतिशय सावध प्रतिक्रिया व्यक्त केली. एवढेच नव्हे तर हे सांगायची पात्रता माझी नसल्याचेही त्या म्हणाल्या. मुख्यमंत्री ठरवण्याचा अधिकारी पक्षाच्या प्रमुख नेत्यांचा आणि कोअर कमेटीचा असतो. त्यामुळे आताचा त्यावर भाष्य करणे उचित नाही असे सांगून त्या मोकळ्या झाल्या.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी जाहीर सभा घेऊन त्यांनी वेगळी वाट चोखळणार असल्याचा इशारा भाजपला दिला होता. या सभेला एकनाथ खडसे हेसुद्धा होते. खडसे यांनी याच सभेत पक्षातून बाहेर पडत असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले होते.

या दम्यान पंकजा मुंडे Pankaja Munde यांनी आपल्या वक्तव्यावरून अनेकदा वाद ओढावून घेतले होते. लोकसभेच्या निवडणुकीत धक्कादायक पराभव झाल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी आत्महत्यासुद्धा केलेल्या आहेत.

विधान परिषदेच्या अकरा जागा असताना अधिक अर्ज आहेत. हे बघता मतदान अटळ दिसते. उद्या शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घ्यायचा दिवस आहे. नंतरच निवडणूक अविरोध होते की मतदान याचा निर्णय होईल. मतदान झाले तरी भाजपची काही अडचण नाही. आमचे सर्व उमेदवार निवडून येतील असा विश्वास आम्हाला असल्याचे मुंडे यांनी सांगितले.

विधान परिषदेचे उमेदवारी जाहीर होताच आपण मंत्री होणार असल्याची चर्चा राज्यात आहेत. यावर त्या म्हणाल्या, चर्चा होतच असतात. ती प्रत्यक्षात आल्याशिवाय यावर भाष्य करण्यात अर्थ नाही. मात्र काहीतरी होत असते तेव्हाच चर्चा रंगतात हे सांगायला त्या विसरल्या नाहीत. विनोद तावडे प्रदेशाध्यक्ष होणार, की नाही याबाबत आपणास माहिती नाही. जो पर्यंत रस्त्यावर उतरत नाही तोपर्यंत यावर काही सांगू शकत नसल्याचे त्यांनी सांगितले.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे Chandrashekhar Bawankule यांच्या आईचे निधन झाले आहे. त्यांचे सांत्वन करण्यासाठी पंकजा मुंडे आज नागपूरल्या आल्या होत्या. नागपूर विमानतळावर त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT