Firing @ Chandrapur : राज्यात पुन्हा गोळीबार; मनसेचा पदाधिकारी जखमी

Chandrapur MNS : चंद्रपुरातील मध्यवर्ती आणि गजबजलेल्या ठिकाणी गोळीबार झाल्याने पोलिसांपुढील आव्हान वाढले आहे.
Firing @ Chandrapur
Firing @ ChandrapurSarkarnama

Chandrapur Crime News : गेल्या काही महिन्यांपासून राज्यात गोळीबाराच्या काही घटना घडल्या आहेत. या घटनांत थेट राजकीय पदाधिकाऱ्यांचा समावेश असल्याने खळबळ उडाली आहे.

आता चंद्रपूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणीच गोळीबाराची घटना घडली आहे. यात मनसेचा पदाधिकारी जखमी झाला आहे. गोळीबाराचा हा थरार सीसीटीव्हीत कैदा झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ सूत्रे फिरवून शहरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले.

या गोळीबाबत अमन अंधेवार हा युवक जखमी झाला असून तो महाराष्ट्र नवनिर्माण MNS कामगार सेनेचा जिल्हाप्रमुख असल्याचे समजते. शहरातील रघुवंशी कॉम्प्लेक्समध्ये ही घटना घडली असून याच संकुलात त्याचे कार्यालय आहे. हा गोळीबार जुन्या वैमनस्यातून झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

गोळीबाराची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका यांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी तपास सुरू केल्याची माहितीही मुम्मका यांनी दिली आहे. गोळीबार झाला तो परिसर कायम वर्दळीचा असतो. या गजबजलेल्या ठिकाणी भर दुपारी झालेल्या गोळीबाराने शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांपुढे आव्हान आहे.

Firing @ Chandrapur
Porsche Car Accident Case : विशाल अगरवाल पळाला? नेमकं काय झालं पोलिसांनी सांगितलं

दरम्यान, वर्षभरापूर्वी याच ठिकाणी अमन अंधेवार यांच्या लहाव भावावरही त्याच आरोपीने गोळीबार केला होता. एकाच आरोपीने सख्ख्या भावांवर वर्षात गोळीबार केल्याने शहरात चर्चेचा विषय बनला आहे. जुन्या वादातून हा गोळीबार झाल्याचे बोलले जात असले तरी या प्रकरणी पोलिसांनी विविध बाजूने तापास सुरू केला आहे. तपासाअंती खरे कारण समोर येईल, असे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले.

गोळीबाराची घटना सीसीटीव्हीत कैद

चंद्रपुरातील मध्यवर्ती असलेल्या रघुवंशी कॉम्पॅक्समध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यावर झालेल्या गोळीबाराची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झालेली आहे. त्यात अमन अंधेवार हे फोनवर बोलताना दिसतात. त्याचवेळी अंधेवार यांच्या पाठिमागून तिथे एक व्यक्ती येते तिच्या पाठिवर बॅग आहे.

ती व्यक्ती आपल्या बॅगेतून बंदूक काढते आणि अमन अंधेवार यांच्यावर गोळीबार करते. या गोळीबारातील काही गोळ्या अमन यांना लागतात. यातूनही प्रसंगावधान राखत अंधेवार जीव आकांताने तेथून पळ काढता. तर गोळीबार केल्यानंतर आरोपीही घटनास्थळावरुन पसार होतो.

Firing @ Chandrapur
T-20 World Cup : राज्य सरकार गुजरातच्या 'आका'समोर झुकले; T-20 जल्लोषावरून नाना पटोलेंचा हल्लाबोल, नेमकं काय झालं?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com