Sunil Kedar
Sunil Kedar Sarkarnama
विदर्भ

Parseoni APMC Election Results : केदारांशी लढता लढता भाजपची झाली दमछाक, पारशिवनीत उडवला धुव्वा…

सरकारनामा ब्यूरो

Nagpur District's Parseoni APMC Election Result : माजी मंत्री, आमदार सुनील केदार यांच्या ताब्यात मागील अनेक वर्षांपासून पारशिवनी कृषी उत्पन्न बाजार समितीची सत्ता आहे. त्याला खिंडार पाडण्यासाठी भाजप-शिवसेनेने अनेकदा प्रयत्न केले. पण भाजपला सुनील‌ केदारांच्या गडाला खिंडार पाडता आले नाही. (Kedar's stronghold could not be demolished)

भाजप शिवसेनेने केदारांना शह देण्याच्या प्रयत्नात स्वतःवर नामुष्की ओढवून घेतली. पारशिवनी बाजार समितीच्या निवडणुकीत केदार गटाला संपूर्ण १८ जागांवर विजय मिळाला. तर भाजप-शिवसेनेला हाती भोपळा लागला. सहकार क्षेत्रात केदारांना हरवणे हे भाजप शिवसेनेसाठी दिवास्वप्नच ठरले.

पारशिवनी बाजार समिती जिंकणे भाजपसाठी अशक्यप्राय होते. असे असतानाही अशक्यप्राय असतानाही भाजपने शिंदे गटाला सोबत घेऊन आमदार आशिष जयस्वाल, आजी-माजी जिल्हा परिषद सदस्य, सभापती यांना एकत्र आणून पॅनल लढवले. खूप जोर लावूनही भाजपच्या पदरी निराशाच आली. केदारांना येथे हरवणे अवघड आहे, हे एव्हाना भाजपच्या लक्षात आले असावे.

ग्रामपंचायत गटात वैभव खोब्रागडे हा युवक बहुमताने निवडून आला. या भागात भाजपच्या ताब्यात बहुतांश ग्रामपंचायती आहेत. तरीही भाजपला या गटात हार पत्करावी लागली. ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात असूनही केदारांनी भाजपच्या ताब्यातील ग्रामपंचायतींमध्ये खिंडार पाडून आपला उमेदवार निवडून आणला.

आमदार सुनील केदारांचा मतदारसंघ असलेल्या सावनेर बाजार समितीमध्ये भाजपने न लढणेच पसंत केले. पण पारशिवनी, कुही मांढळ, मौदा या बाजार समित्यांमध्ये भाजपने प्रयत्न केला. पण त्यांना यश आले नाही. रामटेकमध्ये (Ramtek) केदारांचेच जुने कट्टर कार्यकर्ते सचिन किरपान यांनी स्वतंत्र पॅनल लढवले आणि विजयसुद्धा मिळवला.

भाजपप्रणीत (BJP) पॅनलने माजी आमदार डी.एम. रेड्डी यांच्या प्रयत्नाने थोडीफार मजल मारली. सचिन किरपानसुद्धा आज ना उद्या केदारांसोबत जाणार असल्याचे सांगण्यात येते. त्यावरून नागपूर (Nagpur) जिल्ह्यातील बाजार समित्यांवर सुनील केदारांचा (Sunil Kedar) वरचष्मा आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT