Dhamangaon APMC Election Result : धामणगावात माजी आमदारांनी विद्यमान आमदारांना चारली धूळ !

Virendra Jagtap : वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात पुन्हा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
Virendra Jagtap and Pratap Adsad
Virendra Jagtap and Pratap AdsadSarkarnama
Published on
Updated on

Amravati District's Dhamangaon APMC Election Result News : अमरावती जिल्ह्यातील धामणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ सदस्यांच्या निवडणुकीत काँग्रेसप्रणीत शेतकरी सहकार पॅनलचा दबदबा पहावयास मिळाला. १८ पैकी १६ जागांवर विजयी मिळवीत माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात लढलेल्या शेतकरी सहकार पॅनलने पुन्हा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. (The Farmers Co-operative Panel has again proved its supremacy)

आमदार प्रताप अडसड, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विजय भैसे यांच्या शेतकरी विकास पॅनलचा केवळ एक तर एक अपक्ष उमेदवार विजयी झाला. माजी आमदारांनी विद्यमान आमदारांना पराभवाची चव चाखायला लावली. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत व्यापारी/अडते मतदारसंघात भाजपचे गिरीश भुतडा, काँग्रेसचे राधेश्याम चांडक विजयी झाले. तर हमाल/ मापारी मतदार संघातून अपक्ष सुनील ठाकरे विजयी झाले.

ग्रामपंचायत मतदारसंघातून काँग्रेसप्रणीत शेतकरी सहकार पॅनलचे प्रशांत हुडे, मुकुंद माहुरे, मंगेश बोबडे, विलास भील हे विजयी झाले. सेवा सहकारी मतदार संघातून काँग्रेस प्रणीत शेतकरी सहकारी पॅनलचे रवी भुतडा, प्रमोद रोंघे, सचिन सोमोसे, संदीप दावेदार, विपिन ठाकरे, कविता गावंडे, चंदा निस्ताने, दिनेश जगताप, देवराव बमनोटे, संगिता गाडे व मेघा सबाने हे विजयी झाले.

माजी आमदार वीरेंद्र जगताप, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक श्रीकांत गावंडे, बबनराव मांडवगणे, प्रदीप मुंदडा, पंकज वानखडे, रामदास निस्ताने, सुरेश निमकर, महादेव सोमोसे नितीन दगडकर, परीक्षित जगताप, नितीन कनोजिया, रविश बिरे, मुकेश राठी आदींनी विजयी उमेदवारांचे स्वागत केले.

Virendra Jagtap and Pratap Adsad
Shegaon APMC Election Result : शेगावात पाटील ठरले सहकारातील ‘दादा’, भाजपचा केला सुपडा साफ !

सहकारात आपला अजूनही दबदबा आहे, हे माजी आमदार विरेंद्र जगताप यांनी या निवडणुकीतून दाखवून दिले. अमरावती (Amravati) जिल्ह्यातील इतर बाजार समित्यांप्रमाणे भाजपला येथेही कामगिरी करता आली नाही. या निवडणुकीवर आगामी निवडणुकांचे चित्र अवलंबून असेल. त्यामुळे काल लागलेल्या निकालाला विशेष महत्व आहे.

या निवडणुकांचा (APMC) जिल्हा परिषद, (ZP) नगर पंचायत किंवा विधानसभा निवडणुकांवर काहीही फरक पडत नाही, राजकीय नेते असे कितीही सांगत असले तरी काही तरी परिणाम निश्चित होतो. त्यामुळेच सर्व राजकीय (Political) पक्ष बाजार समित्या ताब्यात ठेवण्यासाठी संपूर्ण जोर लावतात. साम, दाम, दंड, भेद सर्वकाही करून या निवडणुका लढल्या जातात. या निवडणुकीतील हार-जीत वर बरेच काही अवबंलून असते, हे निश्‍तिच.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com