Nana Patole and Narendra Modi Sarkarnama
विदर्भ

Nana Patole On PM Modi: ओबीसी आग आहे; सरकारने या आगीत पडू नये, म्हणत नानांचा सरकारला इशारा !

Atul Mehere

Nagpur Political News : भाजपने त्या काळात ती चूक केली आहे, सत्तेसाठी काहीपण ही भाजपची भूमिका आता त्यांच्याच अंगलट येत आहे. २०१४ साली बंजारा समाजाला आदिवासीं शेड्युल कास्ट मध्ये आरक्षण देऊ, असं आश्‍वासन नरेंद्र मोदी यांनी दिले होते. बंजारा समाजाला, मराठयांना आश्वासन देऊन सत्तेत आणले. पण त्यांना न्याय देऊ शकले नाही, असे म्हणत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी पंतप्रधान मोदींवर तोफ डागली. (Maratha community was demanding 16 percent reservation)

आज (ता. सात) नागपुरात पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले, महाराष्ट्रालासुद्धा मणिपूर करण्याचे प्रयत्न भाजपकडून केले जात आहेत. मराठा समाजाची १६ टक्के आरक्षणाची मागणी होती. आता ओबीसी आणि मराठा यांच्यात भांडण लावण्याचे काम होत आहे. ओबीसी आग आहे, या भानगडीत सरकारने पडू नये. जातिनिहाय जनगणना हा यावरचा उपाय आहे. मात्र सत्ताधारी भाजप अजूनही त्याला विरोध करत आहे.

काँग्रेसची (Congress) भूमिका स्पष्ट आहे. आम्ही जातिनिहाय जनगणना करू, असा ठराव रायपूरला करून घेतला. सेन्सेस झालं पाहिजे. भाजपने (BJP) त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे. ‘फोडा आणि राज्य करा’ अशी एकेकाळची इंग्रजांची भूमिका भाजप वठवत आहे आणि आपसांत भांडण लावण्याचा प्रयत्न करत आहे, असेही नाना पटोले (Nana Patole) म्हणाले.

पूर्व विदर्भाच्या गडचिरोली जिल्ह्यात दोन टक्के आरक्षण राहिले आहे. सर्वच समाजाची संख्या वाढली आहे. तिथं आजही लोक मुख्य प्रवाहात आलेले नाहीत. ५० टक्के सिलिंग तुटले पाहिजे. अधिवेशन बोलवत आहात आणि अजेंडा पुढे येत नाही. मणिपूर पेटले आहे, पण पंतप्रधान बोलायला तयार नाही, हे काय चाललं?

सरकारने स्वतःच्या चुकीमुळे ओबीसी-मराठ्यांत भांडण लावू नये. जातिनिहाय जनगणना केली पाहिजे आणि ४० टक्के आरक्षण सीमा काढून टाकली पाहिजे. मात्र सरकार गैरसमज पसरवत आहे. त्यात महागाई बेरोजगारी हा विषय अधिवेशनात घ्या, असं पत्र सोनिया गांधी यांनी दिलं,

त्यावर अद्याप कुणीही बोलले नाही. गायकवाड आयोग हा चुकीचा आहे, हे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं. तिरोडकर, सदावर्ते हे कोणाचे माणसं होते,? मराठ्यांची बाजू मांडू नका, हे फडणवीसांनी सांगितलं, म्हणून तर देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागितली, असेही पटोले म्हणाले.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT