<div class="paragraphs"><p>OBC Decision&nbsp;</p></div>

OBC Decision 

 

Sarkarnama

विदर्भ

‘त्या’ आठ जिल्ह्यांतील ओबीसींच्या नोकरभरतीचा मार्ग मोकळा...

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : अनुसूचित जमातीची लोकसंख्या अधिक असलेल्या आठ जिल्ह्यांमध्ये गट-क व गट-ड संवर्गातील सर्व सेवेच्या भरतीसाठी ओबीसींचे (OBC) सुधारित आरक्षण निश्चित करण्याचा निर्णय १५ सप्टेंबर २०२१च्या मंत्रिमंडळात घेण्यात आला व लगेच २३ सप्टेंबर २०२१ रोजी याबाबतचा शासन निर्णय सुद्धा निर्गमित करण्यात आला होता. संबंधित निर्णयाबाबतची सुधारित बिंदुनामावली जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आठही जिल्ह्यांतील ओबीसी नोकरभरती करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती आज मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी दिली.

नाशिक, यवतमाळ, धुळे, नंदुरबार, पालघर, रायगड, चंद्रपूर आणि गडचिरोली या ८ जिल्ह्यांतील ओबीसींची नोकरभरती आता सुरळीत होणार आहे. ३ जानेवारी २०२२ रोजी सुधारित बिंदुनामावलीचा आदेश सामान्य प्रशासन विभागाने जारी केला आहे. सदर बिंदुनामावली, शासन निर्णय निर्गमित झालेल्या दिनांकापासून म्हणजे २३ सप्टेंबर २०२१ पासून अनुसूचित जमातींची लोकसंख्या जास्त असलेल्या नाशिक, यवतमाळ, धुळे, नंदुरबार, पालघर, रायगड, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यातील जिल्हास्तरीय गट क व गट ड मधील पदे सरळ सेवेने भरती करण्यासाठी या सुधारित बिंदूनामावलीचा अवलंब करण्याची सूचना सामान्य प्रशासन विभागाने केली आहे.

अनुसूचित जमातीची लोकसंख्या अधिक असलेल्या ८ जिल्ह्यांमध्ये गट क व गट ड संवर्गातील सरळ सेवेच्या भरतीसाठी ओबीसींचे सुधारित आरक्षण निश्चित करण्याचा निर्णय नुकताच मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. पालघर, नाशिक, धुळे, नंदूरबार, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, रायगड या ८ जिल्ह्यांमधील ओबीसींच्या आरक्षणात काही प्रमाणात वाढ झाली आहे. ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करण्यात यावे, यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने दीर्घकालीन लढा दिला आहे. हा निर्णय म्हणजे महाविकास आघाडी सरकारचे मोठे यश आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT