विजय वडेट्टीवार म्हणाले, ‘या’ कारणामुळे पुढे ढकलली कॅबिनेटची बैठक...

पुण्यातील शाळा सुरू ठेवायच्या की नाही, याचा निर्णय पालकमंत्री आज घेणार आहेत. पुण्याचे महापौर लवकरच पालकमंत्र्यांशी आज चर्चा करणार आहेत, असे वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी सांगितले.
Vijay Wadettiwar

Vijay Wadettiwar

Sarkarnama

Published on
Updated on

चंद्रपूर : आपल्या राज्यातील १३ मंत्री आणि जवळपास ७० आमदारांना कोरोनाची लागण झाली आहे आणि कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या १३ हजाराच्या पुढे गेलेली आहे. ओमीक्रॉनचा (Omicron) धोका आहेच, पण रुग्णसंख्या सध्या कमी आहे. आता कोरोनाला पुन्हा एकदा गांभीर्याने घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळेच आजची कॅबिनेटची बैठक पुढे ढकलण्यात आली आहे, असे आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) आज येथे म्हणाले.

मंत्री वडेट्टीवार म्हणाले, राज्यातील कोविड निर्बंधांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेणार आहेत. पण सध्यातरी कोरोना परिस्थिती व मंत्री बाधित झाल्याने मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. शिवाय स्थानिक परिस्थितीनुसार निर्बंध अधिक कडक करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. पुण्यात बाधितांची संख्या वाढत असल्याने शाळा सुरू ठेवण्याबाबत आज निर्णय होणार आहे. कोविड टास्क फोर्सची बैठक नियमित होत असते आणि त्यामध्ये झालेल्या निर्णयाविषयी मुख्यमंत्री अंतिम निर्देश देतील, असे सांगत राज्यातील कोरोना परिस्थिती स्फोटक असून लॉकडाउन हा शेवटचा पर्याय आहे.

मुख्यमंत्री दर दोन-तीन दिवसांनी टास्क फोर्सची बैठक घेत असतात. त्यानंतर निर्देश देत असतात, तेव्हा आम्ही बैठकीत झालेल्या निर्णयांची अमलबजावणी करीत असतो. राज्यातील सद्यःस्थिती पाहता काही निर्बंध आम्ही लावलेच आहेत. लग्नकार्य आणि खुल्या जागांवर होणाऱ्या कार्यक्रमांवर बंधने आणली आहेत. शाळांच्या बाबतीत त्या-त्या भागांतील परिस्थिती बघून निर्णय घेतले जाणार आहेत. पुण्यातील शाळा सुरू ठेवायच्या की नाही, याचा निर्णय पालकमंत्री आज घेणार आहेत. पुण्याचे महापौर लवकरच पालकमंत्र्यांशी आज चर्चा करणार आहेत, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.

<div class="paragraphs"><p>Vijay Wadettiwar</p></div>
वडेट्टीवार म्हणाले, भाजपने फूट पाडण्यासाठी हा अजेंडा राबविला...

पूर्ण लॉकडाऊन सध्या नाहीच...

ज्या झपाट्याने रुग्णसंख्या वाढत आहे, त्यामुळे महाराष्ट्रातील परिस्थिती स्फोटक आहेच. अशा परिस्थितीत सुरक्षेच्या दृष्टीने काही निर्बंध लावणे गरजेचे आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मत आहे आणि तसे काही निर्बंध लावले गेले आहेत. सध्या पूर्णतः लॉकडाऊन करण्याचा सरकारचा कुठलाही विचार नाही. पण निर्बंध मात्र कडक केले जाणार आहेत आणि जर का परिस्थिती हाताबाहेर गेली, तरच लॉकडाऊन करण्याचा विचार केला जाईल, असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

BJP
Model Code of Conduct
Viplav Bajoria
Parbhani-Hingoli MLC Election 2026; Former MLA Viplav Bajoriya, Eknath Shinde And Devendra fadnavis
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com