Nagpur ZP News : नागपूर (Nagpur) जिल्हा परिषदेच्या (ZP) पारशिवनी पंचायत समितीच्या पेंशन घोटाळा प्रकरणात आतापर्यंत ३० बोगस खाती समोर आली आहेत. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून २४ अधिकारी, कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदविले जाणार असल्याची माहिती आहे. या प्रकरणी आतापर्यंत सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे.
घोटाळ्यातील (Scam) मुख्य आरोपी सरिता नेवारेसह खैरकर नामक लेखाधिकाऱ्यालाही अटक करण्यात आली. पोलिसांच्या (Police) चौकशीत आणखी काही आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. आतापर्यंत पोलिसांनी मुख्य सूत्रधार सरिता नेवारे हिच्याकडून सोन्याचे दागीने, फर्निचर, ट्रक, स्कार्पिओ व फर्निचर जप्त केले आहेत.
हा मुद्देमाल ६० ते ७० लाखांच्या घरात आहे. इमारत जप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या इमारतीची किंमत बाजारभावानुसार ६० लाखाच्या घरात असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याशिवाय, नेवारे हिने मुलीच्या खात्यावर वर्ग केलेली दोन लाख ३० हजार रुपयांची रक्कम पोलिसांना ताब्यात घेतली. कायदेशीर कारवाई पूर्ण केल्यानंतर इमारत जप्तीची प्रक्रिया पूर्णत्वास जाईल.
आता पोलिसांच्या कारवाईचा ससेमीरा अधिकाऱ्यांच्या पाठीमागे लागणार आहे. या चौकशीत तत्कालीन सहा बीडीओंचाही समावेश आहे. यांच्यासह गट शिक्षणाधिकारी व कर्मचाऱ्यांनाही पोलिसांकडून जबाब नोंदविण्यासाठी बोलविण्यात येणार आहे. सीईओ सौम्या शर्मा यांनी १३ ही तालुक्यांतील पेंशन वाटपसंदर्भात लोकल ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ऑडिटचे काम पूर्ण झाल्याची माहिती आहे.
जिल्हा परिषदेतील पेन्शन घोटाळ्याची रक्कम पावण तीन कोटींच्या घरात गेला आहे. या प्रकरणी आतापर्यंत जिल्हा परिषदेच्या दोन कर्मचाऱ्यांसह सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. जिल्हा परिषदेच्या पारशिवनी पंचायत समितीच्या शिक्षण विभागात पेंशन घोटाळा झाल्याचे समोर आले. येथील महिली लिपीक सरिता नेवारेंनी मृत कर्मचाऱ्यांना जिवंत दाखवत पेंशनची रक्कम स्वतःसह जवळच्या नातेवाइकांच्या खात्यात वळती केली. यासाठी बोगस खातेही तयार केले.
पहिल्या टप्प्यात १७ बोगस खाती समोर आली होती. या खात्यांमध्ये १ कोटी ८६ लाखांची रक्कम वळती करण्यात आल्याचे चौकशी समितीच्या तपासात समोर आले. या समितीच्या आधारे नेवारे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आर्थिक गुन्हे शाखेने नेवारेसह सहा आरोपींना अटक केली. चौकशी समितीला आणखीही काही खाते संशयास्पद आढळली होती. त्यामुळे गट विकास अधिकाऱ्यांकडून सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश तत्कालीन सीईओ योगेश कुंभेजकर यांनी दिले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.