JNU Delhi
JNU Delhi Sarkarnama
विदर्भ

JNU : सोशल मिडियावर व्हायरल झाले ‘त्या’ घोषणांचे फोटो; जेएनयु पुन्हा चर्चेत…

Atul Mehere

Delhi JNU News : दिल्लीतील (Delhi) जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (JNU) पुन्हा एकदा मोठा राडा होणार, असं दिसतंय. विद्यापीठाच्या भिंतींवर ब्राम्हण आणि बनियांच्या विरोधात घोषणा लिहिल्या गेल्या आहेत. त्यामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (एबीव्हीपी) (ABVP) विद्यार्थी संतप्त झाले आहेत. डाव्या विद्यार्थी (Students) संघटनांनाचे हे कृत्य असल्याचा आरोप एबीव्हीपीने केला आहे.

ब्राह्मण कॅम्पस छोडो', 'रक्तपात होईल', 'ब्राह्मण भारत छोडो', 'ब्राह्मण आणि बनिया, आम्ही येत आहोत, आम्ही बदला घेऊ', 'शाखेत परत जा' अशा अनेक घोषणा कॅम्प्सच्या भिंतींवर लिहिल्या आहेत. विशेष म्हणजे, काही प्राध्यापकांच्या दालनाबाहेरही अशाच प्रकारच्या घोषणा लिहिण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यापीठातील वातावरण संतप्त झाले आहे. सतत काही ना काही कारणांनी चर्चेत राहणारे जवाहरलाल नेहरू विद्यापीठ आज झालेल्या या प्रकाराने पुन्हा चर्चेत आले आहे.

बुधवारी रात्री या घोषणा लिहिण्यात आल्या असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यानंतर तोडफोडीचाही प्रकार झाला. पण या घोषणा कुणी लिहिल्या याबाबत मात्र माहिती मिळू शकली नही.कॅम्प्सच्या भिंतींवर लिहिलेल्या जातीयवादी घोषणांची दखल घेत जेएनयू प्रशासनाने निवेदन जारी केले आहे. निवेदनात म्हटले की, ‘जेएनयू समानतेची भाषा करते आणि अशा घटना अजिबात खपवून घेतल्या जाणार नाहीत.’ विद्यापीठाच्या कुलगुरू शांतीश्री धुलीपुडी पंडित यांनी स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीजच्या प्रमुखांना या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

येवढेच नव्हे तर विद्यापीठाच्या भिंतींवर लिहिलेल्या घोषणांचे फोटो सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. विद्यार्थ्यांनी केलेल्या दाव्यानुसार स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडिज्-II भवनच्या भिंतींवर ब्राह्मण आणि बनिया समजाविरोधात घोषणा लिहिल्या गेल्या आहेत. जेएनयू परिसरात यामुळे तणावाचं वातावरण आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जेएनयूच्या प्राध्यापकांच्या केबिनच्या बाहेरील भिंतीवर वादग्रस्त लिखाण करण्यात आलं आहे. ब्राह्मण कॅम्पस सोडा, इथे खून होईल , ब्राह्मण भारत छोडो, आणि ब्राह्मण बनिया आम्ही बदला घेणार असं लिखाण भिंतींवर करण्यात आलं आहे.

डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांचं हे कृत्य असल्याचा आरोप आरएसएसशी संलग्न असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केला आहे. कम्युनिस्ट गुंडांकडून शैक्षणिक ठिकाणांचा मोठ्या प्रमाणात गैरवापर होत आहे, असं म्हणत ABVPने याचा निषेध केला आहे. प्राध्यापकांच्या खोलीच्या काचा फोडून त्यांना धमकावलं असल्याचीही माहिती समोर येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT