Nagpur News: पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 17 सप्टेंबरला वयाची पंच्याहत्तरी पूर्ण करणार आहेत. त्यामुळे ते निवृत्त होणार की नाही याची चर्चा जोरदारपणे सुरू आहे. मध्यंतरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सुद्धा वयावर स्टेटमेंट केले होते. ते मोदी यांच्यासंदर्भात होते असा तर्क लावला जात होता. मात्र,यानंतर त्यांनी त्याचे खंडन केले होते.
याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांना विचारणा केली असता, ते काहीच उत्तर न देता निघून गेले. यावेळी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शंभर वर्ष पूर्ण केल्याचा आनंद व्यक्त केला. असे असले तरी विरोधक अधूनमधून हा मुद्दा उपस्थित करत आहेत.
आध्यात्मिक गुरू तसेच आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर यांच्या रुद्रपुजेचा कार्यक्रम नागपूरमध्ये आयोजित करण्यात आला. याकरिता आपण आलो असल्याने चव्हाण यांनी सांगितले. यावेळी त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या सर्व प्रश्नाची उत्तरे दिली. मात्र नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि गणेश नाईक यांच्या प्रश्नावर त्यांनी बोलण्याचे टाळले.
उपराष्ट्रपदाची निवडणूक भाजपने जिंकली. त्यांचा विजयाचा आनंद आहे. आता विजय कसा झाला आणि कोणाची मते फुटली याचा विचार करण्याची गरज नाही. आमच्या उमेदवाराचा चांगल्या मतांनी विजय झाले अधिक महत्त्वाचे आहे. उद्धव ठाकरे गटाचे मते फुटली की, आणखी कुणाची यावर चर्चा करण्याची गरज नाही.
उपराष्ट्रपती पदासाठी गुप्त पद्धतीने मतदान केले जाते. खासदारांना योग्य उमेदवाराला मत देण्याचा अधिकार आणि मोकळीक असते. सर्वाधिक पसंती भाजपच्या उमेदवाराला असल्याचे यातून दिसून येते असेही ते म्हणाले.
विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हे दोघेही वयाची पंच्याहत्तरी पूर्ण करत आहेत. त्यांचा वाढदिवस भाजप कसा साजरा करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष असताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपात वयाचा आणि निवृत्तीचा काहीच नियम नसल्याचे स्पष्ट केले होते. भारत विकसित राष्ट्र होईपर्यंत मोदी हेच देशाचे नेतृत्व करणार असल्याचा दावाही बावनकुळे यांनी केला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.