Eknath Shinde Shivsena: एकनाथ शिंदेंनी 'टॉपचा गिअर' टाकलाच; BMC निवडणुकीसाठी 'या' 21 अनुभवी नेत्यांची जम्बो टीम उतरवली मैदानात

Shivsena Politics: शिवसेनेतील उभ्या फुटीनंतर पहिल्यांदाच होत असलेल्या बीएमसीची निवडणूक ही उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही नेत्यांसाठी अस्तित्वाची लढाई असणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनंही आता मुंबई महापालिका निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे.
Solapur Yuva Sena News
Solapur Yuva Sena NewsSarkarnama
Published on
Updated on

ठळक मुद्दे:

  1. मुंबई महापालिका निवडणूक ही उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या अस्तित्वाची लढाई मानली जात असून, सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.

  2. उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंशी युतीचे संकेत दिल्याने शिवसेना (उद्धव)–मनसे युतीची शक्यता व्यक्त होत आहे.

  3. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची २१ जणांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर करून निवडणूक मोर्चेबांधणीला वेग दिला आहे.

Mumbai News: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीला आता वर्ष पूर्ण होत आलं आहे. आता राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. या निवडणुकांचा कार्यक्रम दिवाळीनंतर केव्हाही जाहीर होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर आता सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. शिवसेनेतील उभ्या फुटीनंतर पहिल्यांदाच होत असलेल्या बीएमसीची निवडणूक ही उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) या दोन्ही नेत्यांसाठी अस्तित्वाची लढाई असणार आहे. (Ahead of the crucial BMC election, Eknath Shinde has announced a jumbo team of 21 senior leaders to lead Shiv Sena’s campaign. Check the full list and political strategy here.)

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनंही आता मुंबई महापालिका निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे. एकीकडे स्थानिकच्या निवडणुका महायुती म्हणून लढण्याचे संकेत दिले जात आहे. तर दुसरीकडे महायुतीतील भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेनं (Shivsena) मात्र,मोठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केल्याचं दिसून येत आहे.

माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बीएमसीच्या निवडणुकीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी युतीचे संकेत दिले आहेत. ठाकरे बंधूंच्या वाढत्या जवळीकतेनंतर आता मुंबईत शिवसेना-मनसे युती होणार असं गृहित धरलं जात आहे.

Solapur Yuva Sena News
Supreme Court : मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट! हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय अडचणीत? सर्वोच्च न्यायालयात कुणी घेतली धाव

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे या दोन पक्षांतील वाढत्या राजकीय घडामोडीनंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडवर आले आहेत. त्यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची मुख्य कार्यकारी समिती जाहीर केली आहे. यामध्ये 21 प्रमुख नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे.

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक कोणासाठीही सोपी नसणार आहे. त्यामुळे कोणीच कोणाला कमी लेखण्याची चूक करताना दिसून येत नाही. याच धर्तीवर एकनाथ शिंदेंनी शिवसेना पक्षाची मुख्य कार्यकारी समिती तयार करताना तयारीची चुणुक दाखवली आहे.

Solapur Yuva Sena News
मोठी बातमी! महायुती सरकारचा धक्का! पंपावर आता ‘नो PUC नो फ्युएल’ धोरण लागू, परिवहन मंत्र्यांचे थेट आदेश

शिवसेनेच्या कार्यकारी समितीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 21 शिलेदारांचा समावेश करण्यात आला आहे. या सर्वच नेत्यांवर आगामी महापालिका निवडणुकीतील पक्षपातळीवर मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याचे बोलले जात आहे.

शिवसेनेचे प्रमुख नेते, खासदार, माजी खासदार, आमदार, माजी आमदार यांना या समितीमध्ये संधी देण्यात आली आहे. शिवसेनेची ही मुख्य कार्यकारी समिती मुंबईत महत्त्वाचे निर्णय घेण्याची शक्यता आहे.

Solapur Yuva Sena News
Beed Crime : उपसरपंचाच्या मृत्यूनंतर धक्कादायक खुलासे; आत्महत्येदरम्यान नर्तकीचे व्हिडिओ व्हायरलं

शिवसेनेची मुख्य कार्यकारी समितीत एकनाथ शिंदे, रामदास कदम, गजानन कीर्तीकर, आनंदराव अडसूळ, मीना कांबळे, डॉ. श्रीकांत शिंदे, रवींद्र वायकर, मिलिंद देवरा, राहुल शेवाळे, संजय निरुपम, प्रकाश सुर्वे, अशोक पाटील, मुरजी पटेल, दिलीप लांडे, तुकाराम काते, मंगेश कुडाळकर, मनिषा कायंदे, सदा सरवणकर, यामिनी जाधव, दीपक सावंत, शिशिर शिंदे या नेत्यांचा समावेश असणार आहे.

प्र.१: आगामी मुंबई महापालिका निवडणूक का महत्त्वाची आहे?
उ.१: ही निवडणूक उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या राजकीय अस्तित्वाची लढाई मानली जात आहे.

प्र.२: उद्धव ठाकरे कोणासोबत युतीचे संकेत देत आहेत?
उ.२: उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी युतीचे संकेत दिले आहेत.

प्र.३: शिवसेनेची मुख्य कार्यकारी समिती कोणी जाहीर केली?
उ.३: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २१ नेत्यांचा समावेश असलेली समिती जाहीर केली आहे.

प्र.४: या समितीत कोणते नेते सामील झाले आहेत?
उ.४: रामदास कदम, गजानन कीर्तीकर, डॉ. श्रीकांत शिंदे, संजय निरुपम, मनिषा कायंदे यांसह २१ नेते सामील आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com