Narendra Modi Mohan Bhagwat sarkarnama
विदर्भ

PM Narendra Modi : PM नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत प्रथमच येणार एका व्यासपीठावर!

Narendra Modi Mohan Bhagwat Will Share Stage : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या नागपूरमध्ये पंतप्रधान मोदी आणि सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हे सार्वजनिक कार्यक्रमा निमित्त कधीच एका स्टेजवर आले नाहीत. मात्र, लवकरच ते एकाच व्यासपीठावर दिसून येतील.

Rajesh Charpe

PM Narendra Modi News : नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात कधी गेले नाहीत. अनेकदा कार्यक्रम आणि निवडणुकीच्या प्रचारासाठी ते नागपूरला येऊन गेले. लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी नागपूरमध्ये रात्रभर मुक्काम केला होता. मात्र नागपूरमध्ये त्यांनी सरसंघचालकांची भेट घेतली नाही. आता मात्र संघाच्या मुख्यालय असलेल्या नागपूरमध्ये पंतप्रधान मोदी आणि सरसंघचालक डॉ. मोहन भागवत एका कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रथमच एकाच व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत.

माधव नेत्रालयाच्या नवीन इमारतीचा भूमिपूजन सोहळा गुढीपाडव्याच्या दिवशी 30 मार्चला आयोजित करण्यात आला आहे. माधव नेत्रालय आय इन्सिट्यूट आणि रिसर्च सेंटर हे संघाच्या अनेक उपक्रमांपैकी एक आहे.

माधव नेत्रालयाची नवीन इमारत हिंगणा रोडवरील वासुदेव नगर येथे उभारण्यात येणार आहे. सुमारे साडेसहा एकर परिसरात ही इमारत प्रस्तावित आहे. नेत्र रुग्णांना अद्यावत सुविधा येथे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या इमारतीच्या भूमिपूजनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित करण्यात आले आहे. त्यांनी येण्याचे मान्य केले असल्याचे सांगण्यात येते.

या कार्यक्रमला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनाही निमंत्रित केले आहे. या निमित्ताने नागपूरमध्ये मोदी आणि गडकरी हेसुद्धा एका व्यासपीठावर येणार आहेत. स्वयंसेवक असताना मोदी हे नियमित संघमुख्यालयात येत असत. गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यानंतरही ते अनेकदा संघ मुख्यालयात येऊन गेले. पंतप्रधान झाल्यानंतर मोदी आतापर्यंत संघ मुख्यालयात आले नाहीत हे विशेष.

लोकसभेच्या निवडणुकीत मोदी यांनी नागपूर आणि रामटेक विधानसभा मतदारसंघासाठी एकत्र सभा घेतली होती. ही सभा रामटेक लोकसभा मतदारसंघातील कन्हान येथे घेण्यात आली होती. हा अपवाद वगळात मोदी आणि गडकरी सहसा एकाच कार्यक्रमाला उपस्थित राहत नसल्याचे दिसून येते. विदर्भातील अनेक कार्यक्रमांना मोदी आले असता गडकरी मात्र त्या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते. त्यामुळे वेगवेगळ्या चर्चा उपस्थित केल्या जातात. आता मात्र संघानेच अधिकृत निमंत्रण दिले असल्याने या कार्यक्रमाला कोणाला दांडी मारता येणार नाही असे दिसते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT