
Kolhapur News : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने सदस्य नोंदणीचा डाव टाकून कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या प्रवाहात ठेवण्याचं काम केले आहे. अशातच जिल्हास्तरावर भाजपला मजबूत करण्यासाठी अन्य पक्षातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते गळाला लावण्याचे डाव खेळले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात देखील महाविकास आघाडी मधील काही महत्त्वाचे पदाधिकारी, नेते यांची पक्षप्रवेशासाठी यादी तयार असल्याचा दावा राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी आहे. यामुळे येत्या महिनाभरात अशांचा पक्षप्रवेश होणार आहे. मुंबईत वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होणार असून पहिल्यांदाच कागलमधील महाविकास आघाडीचे नेते माजी आमदार संजय घाटगे व त्यांचे पुत्र गोकुळचे संचालक अंबरीश घाटगे यांचा पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकीत यश मिळाल्यानंतर भाजपकडून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत देखील यश मिळवण्यासाठी जयत तयारी सुरू आहे. शिवाय पक्ष वाढवण्याचा दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनासनुसार भाजप सदस्य नोंदणी राज्यातील प्रत्येकी जिल्ह्यात सुरू आहे. विधानसभा निवडणुकीत यश मिळाल्यानंतर इतर पक्षातील नेते पदाधिकाऱ्यांचा देखील भाजपकडे कल वाढला आहे.
सध्याचे चित्र पाहता कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात भाजपची ताकद आहे. मात्र भाजपच्या चिन्हावर सदस्य निवडून आणण्यासाठी महत्त्वाचे पदाधिकारी आणि नेत्यांची कमतरता आहे. ही कमतरता कमी करण्यासाठी भाजपमध्ये पक्षप्रवेश सुरू आहे. शिवाय मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी त्याची जबाबदारी राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांच्यावर सोपवल्यानंतर येत्या काळात अनेकांचा पक्षप्रवेश होणार आहे.
त्याबाबतची यादीच आपल्याकडे असल्याचा दावा राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक करत आहेत. यामध्ये शिवसेनेचे नेते माजी आमदार संजय घाटगे, अंबरीश घाटगे यांचा पक्षप्रवेश या महिना अखेर होण्याची शक्यता दाट आहे. गेल्या काही दिवसांपासून घाटगे यांचा पक्ष रखडला होता. जिल्हा परिषदेसोबत कोल्हापूर शहरातील देखील काही पदाधिकारी भाजपच्या वाटेवर आहेत. मात्र अशा पदाधिकाऱ्यांना घेतल्यानंतर पूर्वीचे पदाधिकारी नाराज होऊ नये याची देखील खबरदारी भाजप घेताना दिसत आहे.
महिनाअखेर घाटगे यांचा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र कागलमधील दोन्ही घाटगे हे भाजपमध्ये जाण्यास तयार आहेत. शाहू ग्रुपचे अध्यक्ष आणि महाविकास आघाडीचे नेते समरजीत घाटगे यांची देखील घर वापसीची चर्चा सुरू झाली आहे. तर माजी आमदार महाविकास आघाडीचे नेते संजय घाटगे हे पुत्र अंबरीश घाटगे यांचे राजकीय पुनर्वसन करण्यासाठी भाजपमध्ये जाण्यासाठी उत्साही आहेत. त्यामुळे भाजपमध्ये कोणत्या घाटगेंचा पक्षप्रवेश होणार हे त्याच दिवशी समजणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.