Yashomati Thakur
Yashomati Thakur  Sarkarnama
विदर्भ

Yashomati Thakur Threat: यशोमती ठाकूर यांना धमकी देणारा अटकेत; पोलिसांची कारवाई

सुरेंद्र चापोरकर

Amravati News : काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला पोलिसांनी मंगळवारी अटक केली असून धमकी देणारा हा यवतमाळ जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. कैलास गणेश सूर्यवंशी (वय २७,रा.पुसद,जिल्हा यवतमाळ ) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

अमरावतीत शिवप्रतिष्ठांच्यावतीने जुलैमध्ये संभाजी भिडे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत त्यांनी महात्मा गांधी यांच्या संदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर काँग्रेसच्यावतीने निषेध व्यक्त करण्यात आला होता. यानंतर यशोमती ठाकूर यांनी आपली नाराजी व्यक्त करताना संभाजी भिडेंवर जोरदार टीका केली होती.

यानंतर कैलास सूर्यवंशी नामक व्यक्तीने रिट्विट करत यशोमती ठाकूर यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्या विरोधात ठाकूर यांच्यावतीने अमरावती पोलीसांत तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीनंतर गाडगे नगर पोलीस ठाण्यात सूर्यवंशी नामक व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर अखेर आज या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, "ज्या कलमान्वये पोलिसांनी गुन्हा दाखल केला, त्यामध्ये कैलास सूर्यवंशी यास पोलिसांनी नोटीस बजावली होती. त्यानंतर सूर्यवंशी मंगळवारी पोलीस ठाण्यात हजर झाला. त्यानंतर या व्यक्तीला अटक करण्यात आली", अशी माहिती पोलीस निरीक्षक गजानन गुल्हाने यांनी दिली.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT