Anil Gote News: राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का; अनिल गोटे शरद पवारांची साथ सोडणार?

NCP News: अनिल गोटे लवकरच निर्णय जाहीर करण्याची शक्यता
Anil Gote News
Anil Gote NewsSarkarnama

Jalgaon News : धुळे जिल्ह्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील नेते व प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार अनिल गोटे हे शरद पवारांच्या गटाची साथ सोडण्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्ष पदाचा अनिल गोटे यांनी गुरुवारीच पक्ष श्रेष्ठीकडे आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, ते राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात जाणार की, शिवसेनेत (ठाकरे गट) जाणार, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे ते याबाबत काय भूमिका स्पष्ट करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Anil Gote News
Ambadas Danve News : शिवसेनेत नवे नेतृत्व तयार, गद्दारांकडे ढुंकूनही पाहणार नाही..

अनिल गोटे हे धुळे शहराचे माजी आमदार आहेत. सन २०१४ मध्ये भाजपकडून निवडून आले होते. त्यानंतर भाजपमध्ये त्यांचे अंतर्गत वाद झाल्याने त्यांनी २०१९ मध्ये भाजपचा राजीनामा देवून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. राष्ट्रवादी पक्षात गोटे यांना प्रदेश उपाध्यक्ष पद देण्यात आले होते. तसेच गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना धुळे मतदारसंघातून पक्षातर्फे उमेदवारीही देण्यात आली होती. मात्र, त्यांचा पराभव झाला होता.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून अजितदादांसह काही आमदार बाहेर पडल्याने दोन गट निर्माण झाले. अजितदादांनी भाजप-शिवसेनेबरोबर (शिंदे गट) जावून सत्तेत सहभाग घेतला. त्यानंतर धुळे जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते अजितदादांच्या गटात जात आहेत.

तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठीकडे सूपूर्द केला आहे. त्यामुळे ते पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचेही सागंण्यात येत आहे. धुळे येथील पक्ष कार्यालय त्यांच्या ताब्यात होते. मात्र, या ठिकाणीही त्यांनी आवाराआवर केल्याचे बोलले जात आहे.

Anil Gote News
Shasan Aplya Dari: डोळ्यांच्या साथीमुळे आरोग्य विभाग म्हणते गर्दी टाळा; दुसरीकडे 'शासन आपल्या दारी' कार्यक्रम जोरात

अनिल गोटे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट किंवा शिवसेना उद्धव ठाकरे गटात जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र, त्याबाबत ते लवकरच अधिकृत घोषणा करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता ते काय भूमिका घेतात याकडेच लक्ष लागले आहे. मात्र, अनिल गोटे हे शरद पवारांपासून लांब जाणार हे जवळपास निश्‍चित मानले जात असल्याने पवारांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com