<div class="paragraphs"><p>Bhandara Police</p></div>

Bhandara Police

 

Sarkarnama

विदर्भ

काँग्रेस उमेदवाराच्या गाडीतील पैशांवर पोलिसांनीच मारला डल्ला : PSIसह चौघे निलंबित

सरकारनामा ब्यूरो

भंडारा : भंडारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या (Congress) उमेदवाराचे वाहन थांबून त्यातील रकमेवर पोलिसांनीच (police) डल्ला मारल्याचे पुढे आले आहे. या प्रकरणी जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत जाधव यांनी पोलिस उपनिरीक्षकासह चार जणांना निलंबित केले आहे. पोलिस उपनिरीक्षक बंडू थेरे, पोलिस शिपाई रमेश वाघाडे, प्रमोद आरिकर, पोलिस नायक कार्तिक कांबळे अशी त्यांची नावे असून हे सर्व पोलिस कर्मचारी हे कारधा पोलिस ठाण्यात कार्यरत होते. (Police snatch money from Congress candidate's car : Four suspended including PSI)

भंडारा जिल्हा परिषदेच्या आमगाव गटाच्या निवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार रामलाल चौधरी हे 20 डिसेंबर रोजी मतदारसंघात आपल्या चारचाकी वाहनाने गेले होते. त्यावेळी त्यांच्या मागावर असलेल्या कारधा पोलिसांनी आधी गिरोला गावाजवळ त्यांचे वाहन थांबवून तपासणी केली. त्यानंतर उमेदवार चौधरी हे पलाडीजवळ थांबलेले असताना तेथे आलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी पुन्हा त्यांच्या गाडीची तपासणी केली. त्यावेळी त्यांच्या गाडीतील 200 रुपयांच्या नोटांचे तीन बंडल पोलिसांनी काढून घेतले. त्याचा रितसर पंचनामा न करता पोलिसांनी ती रक्कम स्वतःजवळ ठेवून घेतली. तसेच, काँग्रेसचे उमेदवार रामलाल चौधरी यांना तिथून हुसकावून लावण्यात आले होते.

यासंदर्भात तक्रार उमेदवार चौधरी यांनी पोलिसांकडे केली होती. या गंभीर प्रकरणाची दखल भंडारा जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत जाधव यांनी तातडीने घेतली होती. त्यांनी ठाणेदार थोरात यांना चौकशीचे आदेश दिले होते. ठाणेदार थोरात यांनी त्यांचा अहवाल जिल्हा पोलिस अधीक्षक जाधव यांना सादर केला. त्या अहवालावरून पोलिस अधीक्षक जाधव यांनी पोलिस उपनिरीक्षक थेरे यांच्यासह चौघांना निलंबित केले आहे. चौघांची जिल्हा पोलिस मुख्यालयात ड्यूटी लावण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT