Bachch Kadu Vs Navneet Rana : Bachchu kadu Sarkarnama
विदर्भ

Amravati Loksabha Seat : बच्चू कडू-राणा दाम्पत्याचं राजकीय नाट्य पुन्हा सुरू; अमरावतीच्या दाव्यावरून आमने-सामने..

Bachch Kadu Vs Navneet Rana : "कुणी कितीही दावे करोत, रवी राणामध्ये ताकद.."

सरकारनामा ब्यूरो

Amravati News : एकीकडे युती आणि महाविकास आघाडीमध्ये लोकसभा निवडणुकांबाबत चर्चा होत असताना, लोकसभेसाठी नेत्यांच्या वैयक्तिक उमेदवारी व जागांवर दावा सांगण्यात येत आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघावर आता दावा सांगण्यात येत आहे.

प्रहारचे संघटनेचे नेते व आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी अमरावती लोकसभेच्या जागा प्रहारला मिळावी, अशी मागणी केली आहे. तर येथील विद्यमान खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांचे पती आमदार रवी राणा यांनी ही कडूंना जशास तसे उत्तर दिले आहे.

आमदार बच्चू कडू म्हणाले, "आम्ही निवडणुकींच्या तयारीत आहोत. आमची याबाबत एक बैठक झाली. १५ ते २० जागा विधानसभेच्या आणि एक जागा लोकसभेच्या लढवणार आहोत. निवडणुकींच्या सामोरे जाण्याची आमची तयारी आहे. युतीमध्ये घटक पक्ष म्हणून कसे पुढे जाता येईल, याची चाचपणी करतो आहोत. पण युतीत ताळमेळ नाही जमल्यास आम्ही निवडणुकींना वेगळे सामोरे जावू, असा ईशारा त्यांनी भाजपला दिला आहे.

कडू अमरावती लोकसभा जागेबाबत म्हणाले, "अमरावती लोकसभेवरती आमचा दावा आहे. या जागेसाठी आम्ही आग्रही आहोत. यापूर्वी मी इथे निवडणूक लढवली आहे. अपक्ष लढवून पाच हजार मते मिळवली होती. ही जागा आरक्षित आहे. आणि आमच्याकडेही ताकदीचा उमेदवार आहे. कुणाशीही लढत झावी तरी आमचा उमेदवार ताकदीचा आहे. युतीमध्ये ही जागा आम्हाला मिळावी, अशी आमची आग्रही मागणी आहे."

बच्चू कडूंनी अमरावती लोकसभा जागेवरती दावा केल्यानंतर अमरावतीच्या विद्यमान खासदार नवनीत राणा यांचे पती आमदार रवी राणा यांनी कडूंवर पलटवार केला आहे. रवी राणा म्हणाले, "एनडीए चे खासदार म्हणून नवनीत राणांची चर्चा झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना मी मध्यंतरी भेटलो. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससुद्धा आमच्या पाठीमागे ठामपणे उभे आहेत. म्हणून कोण कुठली जागा मागतोय, याने काही फरक पडत नाही. याचा अंतिम निर्णय मोदीजी आणि फडणवीस साहेब घेतील. म्हणून कुणीही कितीही दावे केले, ते दावे खोडून काढण्याची ताकद रवी राणा मध्ये आहे."

रवी राणा यांना लोकसेभेची जागा भाजपकडून निवडणूक लढणार का? असा प्रश्न विचारण्यात आला, यावर राणा म्हणाले, "तो नंतरचा विषय आहे. आम्ही एनडीए सोबत आहोत. एनडीएला ताकदीनं पूर्ण पाठींबा दिलेला आहे. देवेंद्र फडणवीस साहेब माझे नेते आहेत." दरम्यान खासदार नवनीत राणा यांनी आपण आगमी निवडणूकसुद्धा अपक्ष लढवणार असल्याचे जाहीर केले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT