Maharashtra Politics : सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर दिलेल्या निकालानंतर 16 आमदारांबाबत काय होणार, याकडे संपुर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. पण उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे आपल्या आमदारांवर अपात्रतेची वेळ येऊच देणार नाहीत. लवकरच महाविकास आघाडी तुटेल आणि पुन्हा एकदा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गट आणि एकनाथ शिंदे गट एकत्र येतील, असा खळबळजनक दावा काँग्रेसचे निलंबित नेते डॉ. आशिष देशमुख यांनी केला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme court) निकालानंतर शिंदे गटातील १६ आमदारांच्या अपात्रतेवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना निर्णय घ्यावा लागणार आहे. शिवसेनेच्या 16 आमदारांच्या डोक्यावर अपात्रतेची टांगती तलवारही आहे. जर आमदारांवर अपात्रतेचा निर्णय झाला तर पुढील सहा वर्षांसाठी त्यांच्यावर ही अपात्रता लागू होणार आहे. या निर्णयामुळए अनेकजण राजकारणातून बाद होण्याचाही धोका आहे. असंही देशमुखांनी म्हटलं आहे.
कोणताही राजकीय नेता आपल्या आमदारांना अशा प्रकारे अपात्र होताना पाहू शकत नाही. त्यामुळे दोन्ही शिवसेना म्हणजे ठाकरे गट आणि शिंदे गट (Eknath Shinde) आगामी काळात पुन्हा एकत्र येतील, असा दावा देशमुख यांनी केला आहे. इतकेच नव्हे तर, आमदारांच्या अपात्रेचे ताांत्रित मुद्दे पाहिले तर कुणालाही राजकारणातून बाद व्हायला आवडणार नाही. अशा परिस्थितीत दोघांसमोर एकमेव मार्ग असेल तो म्हणजे दोन्ही शिवसेना एकत्र आणणे, असाही दावा देशमुख यांनी केला आहे.
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र आले तर कोणताही आमदार अपात्र होणार नाही. आता दोन्ही नेत्यांकडे हा एकमेव पर्यायच राहिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत सुरु असलेल्या वाटाघाटीला काहीही अर्थ नाही. लवकरच दोन्ही नेते एकत्र येतील आणि शिवसेना भाजपसोबत जाईल, असं देशमुख यांनी सांगितलं आहे.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.