नागपूर महापालिका निवडणुकीत जागावाटपाचा तिढा अधिकच गडद झाला आहे.
अजित पवार गटाने AB फॉर्म वाटप सुरू केल्याने महायुती तुटल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.
विरोधी आघाडीने मात्र समन्वय साधत युती कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
Nagpur News : नागपूरमध्ये इच्छुकांची संख्या, दावे प्रतिदावे आणि वाढत्या मागण्या बघता सर्वच पक्षांना महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढावी लागणार असे चित्र दिसत होते. दिवसेंदिवस जागा वाटपाचा पेच वाढत चालला होता. मात्र आघाडीने यातून मार्ग काढून शहाणपणाचा निर्णय घेतला. आघाडीच्या चर्चेला यश आले असताना भाजप महायुतीचे मात्र भिजत घोंगडे कायम आहे. अशातच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने एबी फॉर्म वाटप करत महायुतीत आघाडी घेतली आहे. या आघाडीमुळे आता येथे युती तुटल्याचे स्पष्ट झाले आहे.
रविवारपासून आघाडीच्या चर्चांना जोर आला होता. काँग्रेस शहर अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांच्या सोबत झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी १२ ते १५ जागा सोडण्याचा फायनल निर्णय घेण्यात आला. यासाठी मागील निवडणुकीत कोणी किती मते घेतली होती हा निकष लावण्यात आला. मागील निवडणुकीत शिवसेनेचे दोन नगरसेवक निवडून आले होते.
याशिवाय १२ उमेदवारांनी दुसऱ्या क्रमांकाची मते घेतील होती. या जागा उद्धव सेनेसाठी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा एकच नगरसेवक निवडून आला होता. मात्र मतविभाजनामुळे काँग्रेसची दहा ते पंधरा उमेदवार पराभूत झाले होते. एकूणच काँग्रेसने आघाडी करून मतविभाजनाचा धोका यावेळी टाळला आहे. मागील निवडणुकीत काँग्रेसचे फक्त २९ नगरसेवक निवडून आले होते. जवळपास निम्मे नगरसेवक दुसऱ्या क्रमांकावर होते. आता उद्धव सेना आणि राष्ट्रवादीची साथ लाभल्यास काँग्रेस आघाडीला मोठी मुसंडी मारता येऊ शकते.
मागील महापालिकेच्या निवडणुकीत भाजपचे १०८ नगरसेवक निवडून आले होते. राज्यात पुन्हा सत्ता आणि नगर पालिकेच्या निकालाने भाजपचा कॉन्फिंडट चांगलाच वाढला आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा १५ टक्के जागेचा प्रस्ताव भाजपने फेटाळून लावला आहे. आता शिवसेनेसोबत बोलणी सुरू आहे. मात्र अद्याप युतीची अधिकृत घोषणा केली नाही. अद्याप कोणालाही निरोप देण्यात आलेले नाही. त्यामुळे शिवसेनेमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे.
भाजपच्याही इच्छुकांना अद्याप निरोप देण्यात आलेले नाही. रविवारी नितीन गडकरी यांच्या बंगल्यावर भाजपच्या नेत्यांची रात्री उशिरापर्यंत बैठक घेण्यात आली. आज सकाळी अनेकांना निरोप दिले जातील अशी शक्यता वर्तविली जात होती. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी फक्त एक दिवस शिल्लक असताना अद्याप कोणालाच निरोप देण्यात आले नसल्याने सर्वांचीच धाकधूक वाढली आहे.
Q1. नागपूर महापालिका निवडणुकीत वाद का निर्माण झाला आहे?
👉 जागावाटप आणि उमेदवारांच्या वाढत्या मागण्यांमुळे वाद निर्माण झाला आहे.
Q2. अजित पवारांच्या AB फॉर्म वाटपाचा अर्थ काय?
👉 युती न मानता स्वबळावर निवडणूक लढण्याचा स्पष्ट संकेत आहे.
Q3. महायुतीत कोणकोणते पक्ष आहेत?
👉 भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट).
Q4. विरोधी आघाडीची स्थिती काय आहे?
👉 आघाडीतील पक्षांमध्ये सहमती होऊन युती कायम ठेवण्यात आली आहे.
Q5. या घडामोडींचा निवडणुकीवर काय परिणाम होऊ शकतो?
👉 मतविभाजन होऊन सत्तासमीकरणे बदलण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.