NCP Political Crisis: शरद पवारांनंतर अजितदादांचा नंबर...; प्रशांत जगतापानंतर आणखी एक बडा नेता बंडाच्या तयारीत; राष्ट्रवादी पुन्हा हादरणार

Ajit Pawar Sharad Pawar Unity: भाजपनं पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये शिंदेंसोबतच्या युतीची घोषणा करतानाच राष्टवादी स्वतंत्र लढणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर अजितदादांनीही आपला प्रदीर्घ राजकीय अनुभव पणाला लावत पुण्यासह पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुका जिंकण्यासाठी आपआपले एक एक पत्ते बाहेर काढत उपलब्ध अशा सर्व पर्यांयावर जाळं टाकण्यास सुरुवात केली आहे.
Ajit Pawar, Prashant Jagtap, Sharad pawar
Prashant Jagtap Ajit Pawar Sharad Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Pune News: राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणाच्या चर्चांना उधाण आले असतानाच माजी महापौर प्रशांत जगताप यांनी तडकाफडकी राजीनामा दिला. या राजीनाम्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीसाठी जगतापांचा राजीनामा हा मोठा धक्का होता. आता प्रशांत जगतापांच्या (Prashant Jagtap) राजीनाम्याचा विषय संपतो ना संपतो तोच आता पुढचा धक्का उपमुख्यमंत्री अजित पवारांना बसण्याची शक्यता आहे.

भाजपनं पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये शिंदेंसोबतच्या युतीची घोषणा करतानाच राष्टवादी स्वतंत्र लढणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर अजितदादांनीही आपला प्रदीर्घ राजकीय अनुभव पणाला लावत पुण्यासह पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुका जिंकण्यासाठी आपआपले एक एक पत्ते बाहेर काढत उपलब्ध अशा सर्व पर्यांयावर जाळं टाकण्यास सुरुवात केली आहे. पण याच अजित पवारांवर आता त्यांचा विश्वसनीय नेता नाराज झाला आहे.

दोन्ही राष्ट्रवादींच्या युतीच्या चर्चांसाठी बैठकांचा धडाका सुरू आहेत.याचदरम्यान,दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्यानं अजित पवारांच्या (Ajit Pawar) पक्षातील इच्छुक उमेदवारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. आपला पत्ता कट होणार असल्याची भीती काही नेत्यांच्या मनात निर्माण झाली आहे. याचवरून राष्ट्रवादीत मोठं नाराजीनाट्य सुरू झालं आहे.

पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष योगेश बहल सध्या अजित पवारांच्या राजकीय रणनीतीवर नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. या नाराजीनाट्याचा उद्रेक होण्याची शक्यता असून योगेश बहल बंडाच्या तयारीत आहे. लवकरच ते आपल्या पदाचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोरदारपणे सुरू आहे.यामुळे शरद पवारांपाठोपाठ अजितदादांनाही धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Ajit Pawar, Prashant Jagtap, Sharad pawar
BJP Election News: घासून नाही तर ठासून...! भाजपची दक्षिण भारतात दमदार एन्ट्री; कट्टर विरोधी राज्यात पहिला महापौर बनवला

पुणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याचं आता जवळपास निश्चित मानलं जात आहे.त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष असलेल्या प्रशांत जगताप यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला. काही दिवसांपूर्वीच जगताप यांनी मात्र दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यास आपण राजकारणातून काही काळासाठी थांबण्याचा इशाराही दिला होता.

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याबाबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून एक समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यात माजी खासदार वंदना चव्हाण,पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे आणि स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विशाल तांबे यांचा समावेश आहे. मात्र,या समितीतून शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना दूर ठेवण्यात आलं होतं.अखेर जगताप यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

Ajit Pawar, Prashant Jagtap, Sharad pawar
Subhash Deshmukh : सुभाष देशमुखांचा भाजपला निर्वाणीचा इशारा; ’निष्ठावंत ज्या पक्षात जातील, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू’

तर दुसरीकडे पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या शहराध्यक्षपदी माजी महापौर योगेश योगेश बहल यांची विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर निवड करण्यात आली होती. तत्कालीन शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी पक्षाचा राजीनामा देत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.

यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष पद रिक्त होते.दरम्यान,अजित पवारांच्या उपस्थितीत योगेश बहल यांची शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. पण आता बहल यांच्या नाराजीनाट्याच्या चर्चांना उधाण आल्यानंतर ते काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com