Aditya Thackeray Nagpur Visit:  Sarkarnama
विदर्भ

Aditya Thackeray Nagpur Visit: कोराडी वीज प्रकल्पावरुन राजकारण तापणार; आदित्य ठाकरेही नागपूरकडे रवाना

वीज प्रकल्पातून निघणाऱ्या धुर आणि राखेमुळे होत असलेली पर्यावरणाची हानी लक्षात घेता या प्रकल्पांचे राख बंधारे बंद करण्याचेही त्यांनी निर्देश दिले होते

सरकारनामा ब्यूरो

Aditya Thackeray News Today: कोराडी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रस्तावित ६६० मेगावॅटच्या दोन वीज युनिटच्या विरोधात नागपूरातील स्थानिकांनी शड्डू ठोकले आहेत. या वादात आता आमदार आदित्य ठाकरे यांनीही उडी घेतली आहे. आदित्य ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर जाणार असून काही वेळातच ते नागपूरकडे रवाना होणार आहेत.

नागपूरातील हॉटेल रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) स्थानिक पर्यावरणप्रेमींशी या विषावर चर्चा करणार असल्याची माहिती आहे. तसेच, कोराडीतील नांदगाव, वराडा या गावांनाही भेटी देणार आहेत. गावकरी व शेतकऱ्यांशी (Farmer) संवाद साधणार आहेत.

दरम्यान, यापुर्वीही  आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) कोराडी आणि खापरखेडा वीज प्रकल्पांची दोनदा पाहणी होती. वीज प्रकल्पातून निघणाऱ्या धुर आणि राखेमुळे होत असलेली पर्यावरणाची हानी लक्षात घेता या प्रकल्पांचे राख बंधारे बंद करण्याचेही त्यांनी निर्देश दिले होते. विशेष म्हणजे या प्रकल्पांचा शेवटपर्यंत त्यांनी पाठपुरावाही केला होता. (Nagpur Politics)

त्यानंतर राज्यात पुन्हा एकदा सत्तांतर झाले आणि पुन्हा कोराडी वीज युनिटची मागणी जोर धरु लागली. पण स्थानिकांनी पुन्हा याला विरोध केला. स्थानिकांच्या आंदोलनात मोठ्या प्रमाणात शेतकरी, गावकरी, शहरी नागरिक सहभागी झाले आहेत. आदित्य ठाकरे या वीज प्रकल्पासाठी होणाऱ्या जनसुनावणीलाही विरोध केला आहे. (Maharashtra politics)

या सर्व गोंधळात आणि आदित्य ठाकरेंच्या नागपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर एक लक्षणीय बाब समोर आली आहे. नागपूरमधील रामटेक परिसरात आदित्य ठाकरे यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून ठिकठिकाणी होर्डिंग्ज लागले आहेत. नागपूरातील युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी हे होर्डिंग्ज लावल्याचे सांगण्यात आले आहे. आदित्य ठाकरेंचा भावी मुख्यमंत्री म्हणून या होर्डिंग्जवर उल्लेख करण्यात आला आहे.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT