Bachchu Kadu sarkarnama
विदर्भ

बच्चू कडूंचा 'प्रहार', एकहाती सत्ता ; भाजपला भोपळा

भाजपला एकही जागा मिळालेली नाही. मंत्री राजेंद्र शिंगणे आणि संजय कुटे या दोघांना हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.

सरकारनामा ब्युरो

बुलढाणा : राज्यमंत्री बच्चू कडू (bacchu kadu) यांच्या प्रहार जनशक्ती पक्षानं (prahar janshakti party) बुलढाण्यातील संग्रामपूर नगरपंचायतीत (sangrampur nagar panchayat) एकहाती बाजी मारली आहे. बच्चू कडूंच्या प्रहार जनशक्तीच्या 12 उमेदवार निवडून आले आहेत. काँग्रेसला 4 तर शिवसेनेला एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. तर भाजपला एकही जागा मिळालेली नाही. मंत्री राजेंद्र शिंगणे आणि संजय कुटे या दोघांना हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.

बच्चू कडू म्हणाले, ''आम्ही फार कमी जागा लढविल्या आहेत. पण आम्हाला ७५ टक्के यश मिळाले आहे. दहा-वीस वर्षापूर्वी झालेली पक्ष बांधणी त्याला आज जनतेकडून प्रतिसाद मिळत आहे. कार्यक्रत्यांनी केलेली मेहनत महत्वाची आहे. आम्ही केलेल्या कामाची ही पोचपावती आहे. एकूण जागा लढविल्या कमी, पण यश मात्र जास्त मिळाले आहे,''

''राजकारण हे जाती-पाती, धर्म, झेंड्यावर होत नाही, आम्हाला ते सिद्ध करुन दाखवायचे आहे की मंदिर-मशिद असे विषय घेऊन उपयोग नाही, आम्ही सेवेचा विषय घेऊन लोकांमध्ये गेलो. त्याला प्रतिसाद मिळत आहे. हा सेवेचा अजेंठा घेऊन आम्ही महाराष्ट्र घेऊन जात आहोत. सेवेचा अजेंठा घेऊन तुम्ही जनतेत गेलो तर यश नक्की मिळते. येत्या जिल्हापरिषद, नगरपालिकेच्या निवडणुकीत आमच्या सोबत कोणी आले तर ठिक आहे, नाहीतर आम्ही स्वतंत्र लढू,'' असे बच्चू कडू म्हणाले.

बुलढाण्या जिल्ह्यातील मोताळा व संग्रामपूर नगरपंचायत निवडणुकीत भाजपचे माजी मंत्री आमदार संजय कुटे यांना धोबीपछाड देत संग्रामपूर येथे बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्तीला मतदारांनी पसंती दिली आहे. पहिल्यांदाच निवडणूक झालेल्या संग्रामपूर नगरपंचायतमध्ये प्रहारने १२ आपले वर्चस्व मिळविले आहे. या ठिकाणी त्यांना स्पष्ट बहुमत मिळालं आहे.

बुलडाण्यात बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्तीला घवघवीत यश मिळाले आहे, तर मोताळा नगर पंचायतच्या निवडनुकीत १२ जागांवर काँग्रेस विजयी झाली आहे. तर, सेना ४, राष्ट्रवादी १ जागेवर विजयी झाले आहे. मोताळा नगर पंचायतमध्ये कॉग्रेसने १२ ठिकाणी विजय मिळवत एक हाती सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निवडणुकीत भाजपाला खाते सुद्धा उघडता आले नाही.मोताळ्यात काल (ता. १८) चार जागेसाठी मतदान झाले. या चार जागेसाठी एकूण १५ उमेदवार होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT