Manoj Jarange and Prakash Ambedkar Sarkarnama
विदर्भ

Prakash Ambedkar : जरांगेंसोबतच्या बैठकीत आंबेडकरांनी घेतला ‘हा’ निर्णय !

Manoj Jarange : आम्ही महाविकास आघाडीला म्हणालो होतो की, जरांगे पाटील हा 'फॅक्टर' आपण लक्षात घेतला पाहिजे. पण दुर्दैवाने तो फॅक्टर काही लक्षात घेतला नाही आणि म्हणून काल जरांगे पाटील आणि पक्षाच्या नेत्यांची मी आणि किसन चव्हाण अशी बैठक झाली.

सरकारनामा ब्यूरो

Prakash Ambedkar : अकोला, लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील नामांकन अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अखेर वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारांची घोषणा केली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी अकोल्यात ही घोषणा केली आहे, तर दुसरीकडे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा करून काही निर्णय घेतल्याची माहिती प्रकाश आंबेडकर यांनी आज (ता. 27) अकोला येथील पत्रकार परिषदेत दिली.

महाविकास आघाडीबाबत बोलणं या वेळी आंबेडकर यांनी टाळलं. त्यामुळे महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातील बोलणी अद्यापही सुरूच असल्याच्या चर्चा यावरून रंगल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारी नामांकन अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अखेर प्रकाश आंबेडकर यांनी अकोल्यात पत्रकार परिषद घेऊन काही उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. दरम्यान, कालपासून वंचित आणि महाविकास आघाडी यांच्यात आघाडी झाली की, बिघाडी याबाबत आंबेडकर माहिती देतील, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, आंबेडकर यांनी या विषयावर काहीच न बोलता मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत झालेल्या चर्चेतून काही निर्णय झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

आम्ही महाविकास आघाडीला म्हणालो होतो की, जरांगे पाटील हा 'फॅक्टर' आपण लक्षात घेतला पाहिजे, पण दुर्दैवाने तो फॅक्टर काही लक्षात घेतला गेला नाही आणि म्हणून काल जरांगे पाटील आणि पक्षाच्या नेत्यांची मी आणि किसन चव्हाण अशी बैठक झाली. या बैठकीमध्ये पहिल्या टप्प्यातील नामांकन अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने दुसऱ्या फेजपासूनच लोकसभा निवडणुकीच्या संदर्भातली असणारी चर्चा ही 31 मार्च, 1 एप्रिल आणि 2 एप्रिलला पूर्ण करायची, असा त्या ठिकाणी निर्णय झाला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

चर्चेदरम्यान शेतकऱ्यांचा आणि बेरोजगारांच्या प्रश्‍नांना प्राधान्य कसं द्यायचं आणि ग्रामीण भागातून उद्योजक आणि व्यवसाय कसे वाढवता येतील, या संदर्भात आणि इतर प्रश्नांवरसुद्धा चर्चा झाली असल्याचे आंबेडकर म्हणाले. या महत्त्वाच्या चर्चेमध्ये आजपर्यंत ओबीसी समाजाचा लोकसभेमध्ये एक किंवा दोन व्यक्ती सोडला तर गेल्या 70 वर्षांमध्ये प्रतिनिधी दिलेलं नाही. तेव्हा यावेळेस ओबीसी, भटके विमुक्त हा फॅक्टर लक्षात घेता या समूहातून उमेदवारी द्यायची आणि त्यांना निवडूनही आणायचं. भाजपने जे मुस्लिमांच्या आयसोलेशनचे राजकारणास सुरुवात केली आहे, त्याला थांबवण्यासाठी या लोकसभेमध्ये मुस्लिम उमेदवारसुद्धा आपण उतरवायचा आणि त्यांनाही उमेदवारी द्यायची.

जैन समाजाचासुद्धा उमेदवार आपण द्यायचा आणि त्याला जिंकून आणायचं, असं आमच्या बैठकीत ठरलं असल्याचं आंबेडकर म्हणाले. वंचितांची आणि गरीब मराठा, मुस्लिम आणि इतर यांची ही नवीन वाटचाल आणि त्या ठिकाणी मानतोय या वाटचालीला समूह पाठिंबा देईल, अशी अपेक्षा असल्याचे आंबेडकर म्हणाले, तो दुसरं सगळ्यात महत्त्वाचा जो निर्णय झाला. तो म्हणजे राजकारण आणि निवडणूक यामध्ये प्रचंड पैसा खर्च केला जातो. त्यामुळे निवडून गेल्याची बांधिलकी ही मतदाराबरोबर राहत नाही, तर त्याला ज्यांनी डोनेशन दिलं त्याच्याशी त्याची बांधिलकी होते.

अशी परिस्थिती येऊ नये म्हणून गावागावानेच आणि कार्यकर्त्यांनी प्रचाराला सुरुवात केली पाहिजे, शासनाने नेमून दिलेल्या खर्चाच्या मर्यादेच्या आतमध्ये किंवा त्याच्यापेक्षा अर्ध्या खर्चामध्ये या निवडणुका पार पडतील, असा प्रयत्न आमच्याकडून त्या ठिकाणी होणार आहे. आज जे आयाराम गयाराम जे राजकारण आहे. मला इथे उमेदवारी मिळाली नाही तर मी त्या पक्षामध्ये जातो, हे आपल्याला थांबवता येईल अशी परिस्थिती आहे, असेही आंबेडकर म्हणाले.

हे उमेदवार झाले निश्चित..

भंडारा-गोंदिया- संजय गजानन केवट, गडचिरोली- चिमूर- हितेश पांडुरंग मडावी, चंद्रपूर- राजेश वारलूजी बेले, बुलडाणा- वसंत मगर, अकोला- प्रकाश आंबेडकर, वर्धा- राजेंद्र साळुंखे, यवतमाळ वाशीम- सुभाष पवार, अमरावती- कु प्राजक्ता पिल्लेवान, रामटेक- आज सायंकाळी जाहीर करणार. नागपूर मध्ये काँग्रेसला पाठिंबा तर सांगलीत प्रकाश शेंडगे असल्यास त्यांना पाठिंबा.

Edited By : Atul Mehere

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT