Prakash Ambedkar & Nitesh Rane. Sarkarnama
विदर्भ

Prakash Ambedkar : नितेश राणे हा वेडा आमदार, पोलिसांनी त्याच्याकडे दुर्लक्ष करावे

जयेश विनायकराव गावंडे

Prakash Ambedkar : नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहणाऱ्या आमदार नितेश राणे यांना प्रकाश आंबेडकर यांनी वेडा आमदार म्हटले आहे. पोलिसांनी नितेश राणे यांच्या वादग्रस्त वक्तव्याकडे जास्त लक्ष देऊ नये. नितेश राणेंना पोलिसांनी दुर्लक्ष करावे. त्यांच्या या वक्तव्यामुळे फार काही फरक पडणार नाही. असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले. अकोल्यात माध्यमांशी बोलताना आंबेडकर यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

पोलिस माझे काहीही वाकडे करू शकणार नाही. आपला बॉस सागर बंगल्यावर बसला आहे. तुम्ही कार्यक्रम करा, तुम्हाला सुखरूप घरी पोहोचविण्याची जबाबदारी आमची असल्याचे वादग्रस्त वक्तव्य भाजप आमदार नितेश राणे यांनी केल्यानंतर पुन्हा पोलिसांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. पोलिस आमच्या राज्यात आमच्यावर काय करणार? त्यांना जागेवर राहायचे आहे की नाही? ते माझ्या भाषणाचे चित्रीकरण करून केवळ बायकोला दाखवू शकतील. पोलिस माझे काहीही बिघडवू शकत नाहीत, अशी मुक्ताफळे आमदार राणे यांनी पुन्हा उधळली होती. यानंतर विरोधकांकडून नितेश राणे यांच्यासह भाजपवर जोरदार टीका करण्यात आली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आता याप्रकरणी प्रकाश आंबेडकर यांनीही नितेश राणे यांचा वेडा आमदार म्हणून उल्लेख केला आहे. प्रकाश आंबेडकर बोलताना म्हणाले, आमदार नितेश राणे यांच्या वकव्यामुळे त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. पण पोलिसांनी कारवाई न करता दुर्लक्ष करावे. एक वेडा आमदार बोलत आहे, म्हणून सोडून द्यावे. राणे यांच्या वक्तव्यामुळे कोणताही परिणाम होणार नाही. पोलिसांनी आणि जनतेने याकडे दुर्लक्ष करावे. अशा वक्तव्यांना जास्त महत्व देण्याची गरज नाही. असे लोक दरवेळी काही ना काही बोलतच राहतात. त्यामुळे कोणाला किती महत्व द्यायचे याचे भान प्रत्येकाने ठेवावे असेही ते अकोल्यात बोलताना म्हणाले.

स्मृती कायम राहणार

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या निधनानंतर प्रतिक्रिया देताना प्रकाश आंबेडकर आंबेडकर म्हणाले, त्यांची आणि जुनी ओळख होती. आंबेडकर यांनी मनोहर जोशींच्या निधनावर दुःख व्यक्त केले. ‘रिडल्स’च्या वेळेस एक वेगळे वातावरण निर्माण झाले होते. त्यावेळी मनोहर जोशींनी अतिशय संयमाने हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केल्याचे आंबेडकर म्हणाले. यासोबतच लोकसभेत सभापती असताना त्यांनी अनेक कठीण प्रसंग हसत-खेळत सहजपणे निभावल्याचेही आंबेडकर म्हणाले. त्यांच्या कालावधीत राज्यातील अनेक नाजूक प्रश्न त्यांनी मोठ्या कुशलतेने सांभाळून नेले. त्यात कुणाच्याही मनात कटुता निर्माण होऊ दिली नाही. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्र पोरका झाला असल्याची भावना देखील प्रकाश आंबेडकरांनी बोलताना व्यक्त केली.

Edited By : Prasannaa Jakate

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT