Prakash Ambedkar During Cricket Match. Sarkarnama
विदर्भ

Akola Politics : क्रिकेटच्या मैदानावरही आंबेडकरांनी दाखवून दिले, आम्ही ‘वंचित’ नाही!

Prakash Ambedkar : स्पष्टच सांगितले, ‘इंडिया टीम’मध्ये निवड होणारच नाही...

जयेश विनायकराव गावंडे

Lok Sabha Election 2024 : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी इंडिया आघाडीच्या समावेशावरून मोठे विधान केले आहे. इंडिया आघाडीत आपला समावेश होणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी (ता. 18) क्रिकेटच्या मैदानावर तुफान फटकेबाजी केली. त्यानंतर त्यांनी इंडिया आघाडीतील समावेशावरूनही घटक पक्षांना फटकारले.

अकोला येथे एका क्रिकेट सामन्याचे उद्घाटन करण्यासाठी प्रकाश आंबेडकर आले असता त्यांनी जोरदार फटकेबाजी केली. त्यानंतर ते म्हणाले की, वंचित बहुजन आघाडीचा इंडिया आघाडीत समावेश होणार नाही. पत्रकारांनी विचारले इंडिया टीममध्ये तुमच्या नावाची घोषणा अजुनही झाली नाही. यावर आंबेडकर म्हणाले, ती होणारच नाही. कधीच नाही. त्याच्यामध्ये 30 वर्षांच्या आतील खेळाडू खेळतात. आम्ही त्याच्या पार गेलो आहोत. आपण स्वतःची ‘टीम’ तयार करणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

लोक जे खेळतात त्यात आपण आनंद घ्यायचा, असेही आंबेडकर म्हणाले. विश्वचषक म्हणजेच निवडणूक जिंकण्यासंदर्भात त्यांनी माहीत नसल्याचे सांगितले. इंडिया आघाडीत समावेश होणार नसल्याचे आंबेडकर यांनी सांगितले असले तरी पुढील काळात नेमक्या काय घडामोडी घडतात, ते पाहण्यासारखे राहणार आहे.

वंचित बहुजन आघाडीचा इंडिया आघाडीत समावेशावरून सध्या राजकीय चर्चा सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी काँग्रेसनेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेमध्ये सहभागी होण्याचे निमंत्रण ‘वंचित’चे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांना दिले होते. आंबेडकरांनी हे निमंत्रण स्वीकारले, मात्र इंडिया आघाडीमधील समावेशाचा निर्णय घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. इंडिया किंवा महाविकास आघाडीचा घटक नसताना भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होणे आमच्यासाठी अडचणीचे ठरू शकेल, असे आंबेडकर म्हणाले होते. आता त्यांनी केलेल्या विधानामुळे नेमक्या काय घडामोडी घडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अमरावती येथे काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी महाविकास आघाडीत व इंडिया आघाडीत समावेशाबाबत आपण वंचित बहुजन आघाडीच्या बाजूने असल्याचे स्पष्ट केले. दोन्ही आघाड्यांमध्ये ‘वंचित’चा प्रवेश करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अशातच प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे काँग्रेस ‘वंचित’च्या समावेशाबाबत थापा मारत आहे की आता ‘वंचित’ला दोन्ही आघाड्यांमध्ये जाण्याबाबत कोणतेही स्वारस्य नाही, असे बोलले जात आहे. अद्यापही ‘वंचित’ बहुजन आघाडी ‘वेट अॅन्ड वॉच’च्याच भूमिकेत आहे.

Edited By : Prasannaa Jakate

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT