Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांचं ठरलं! 'या' अटीवर राहुल गांधींच्या यात्रेत जाणार

Bharat Jodo Nyay Yatra : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी वारंवार संपर्क साधूनही वंचितला अद्याप इंडिया आघाडी अथवा महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट करून घेतलेले नाही.
Prakash Ambedkar
Prakash Ambedkarsarkarnama
Published on
Updated on

Mumbai : राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला मणिपूरमधून सुरुवात झाली आहे. या यात्रेचा शेवट मुंबईमध्ये होणार आहे. त्यासाठी देशभरातून काँग्रससोबत असलेले इंडिया आघाडीतील नेते येणार आहेत. या यात्रेच्या समारोपप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनादेखील आमंत्रण देण्यात आले आहे. यात्रेच्या समारोपप्रसंगी उपस्थित राहण्यावरून प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेससमोर अट ठेवली आहे.

Prakash Ambedkar
Gautam Adani-Congress : अदानींचा काँग्रेसला 'हात' : बारा हजार कोटींची गुंतवणूक करणार...

इंडिया आघाडीतील पक्ष यात्रेच्या समारोपप्रसंगी उपस्थित राहणार आहेत. मात्र, इंडिया आघाडीत अजून वंचित बहुजन आघाडीचा समावेश झालेला नाही. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) न्याय यात्रेच्या समारोपाला उपस्थित राहण्याच्या आधी वंचितचा इंडिया आघाडीत समावेश करण्याची अट घातली आहे. इंडिया आघाडी, महाविकास आघाडीत समावेश झाला तरच आम्ही उपस्थित राहू, असे आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (mallikarjun kharge) यांच्याशी वारंवार संपर्क साधूनही वंचितला अद्याप इंडिया आघाडी अथवा महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट करून घेतलेले नाही. यात विडंबन म्हणजे आपण पाठवलेल्या निमंत्रणात "आपण इंडिया आघाडीचे महत्त्वाचे घटक आहात," असे म्हटले आहे. सध्याच्या धर्मांध, जातीय, विभाजनकारी वातावरणात मोदींच्या सरकारविरोधात असणाऱ्यांनी सर्वसमावेशक भूमिका घेणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.

आधी इंडियात निमंत्रण द्या...

इंडिया, महाविकास आघाडीत समावेश नसतानादेखील भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपाला उपस्थित राहिले तर त्याचा चुकीचा अर्थ निघू शकतो. हे निमंत्रण नसताना तुमच्या यात्रेत सहभागी झाल्यास युती झाल्याचे अंदाज बांधले जाऊ लागतील. जी अजून झालेलीच नाही आणि या सर्वांचे नकारात्मक परिणाम होतील. तथापि, आपण इंडिया, महाविकास आघाडीमध्ये सहभागी होण्याचे निमंत्रण द्यावे, असा आमचा आग्रह आहे, असे प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केले आहे.

(Edited By Roshan More)

R...

Prakash Ambedkar
Dharashiv Loksabha : मैदानात तर या..! ओमराजेंनी भाजपला दिले आव्हान...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com