Prakash Ambedkar On Maratha Reservation Sarkarnama
विदर्भ

Prakash Ambedkar News : मराठा आंदोलन चिघळलं, प्रकाश आंबेडकरांचं थेट जरांगेंना पत्र; म्हणाले...

Deepak Kulkarni

Akola News : आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापला आहे. जरांगे पाटलांच्या बेमुदत उपोषणचा सोमवारी सहावा दिवस आहे. त्यांची दिवसागणिक तब्येत खालावत चालली आहे. मराठा समाजाच्या आंदोलकांनी केलेल्या हट्टामुळे त्यांनी फक्त पाणी घेतले आहे. तसेच त्यांनी उपचारासदेखील नकार दिला आहे.

मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांनीदेखील जरांगे पाटलांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे. याचवेळी आता मराठा आंदोलन राज्यात ठिकठिकाणी चिघळलं असतानाच दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी जरांगे पाटलांना पत्र लिहिलं आहे.

राज्यभरात ठिकठिकाणी राजकीय मराठा आंदोलकांच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागत आहे. राजकीय नेत्यांची घरे, पक्षाची कार्यालये, गाड्या लक्ष्य केले जात असून, वातावरण चांगलंच तापलं आहे. तर सरकारने जरांगे पाटलांकडे आरक्षणाचा मुद्दा मार्गी काढण्यासाठी आणखी वेळ मागितला आहे; पण जरांगे पाटलांची प्रकृती खालावली आहे. याच धर्तीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांना काळजीपोटी पत्र लिहिले आहे.

प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी पत्रात आपण प्रामाणिकपणे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी या शोषणाविरुद्ध लढा उभा करीत आहात आणि त्यासाठी तुमचे आरोग्य उत्तम असणे गरजेचे आहे. समाजात लोकांच्या प्रश्नावर आंदोलन करणारेच राहिले नाहीत तर त्यांची बाजू कोण घेणार? गरीब, रयतेच्या मराठ्यांना आपला फार मोठा आधार वाटत आहे. त्यामुळे आपण स्वतःचा जीव सांभाळावा, असे मी आपणास आवाहन मनोज जरांगे पाटलांना (Manoj Jarange Patil) केले आहे.

तसेच मराठा आरक्षणासंदर्भात मागणी करणारे गरीब मराठे आणि सदरची मागणी पूर्ण करू शकणारे सत्ताधारी निजामी मराठे असे दोन्ही बाजूने मराठे असूनही गरीब मराठ्यांची मागणी पूर्ण होत नाही. सत्ता काँग्रेसची असो, भाजपची असो किंवा राष्ट्रवादीची असो त्यांनी गरीब मराठ्यांच्या प्रश्नाला कधीच महत्त्व दिले नसल्याचा आरोपही आंबेडकरांनी पत्रात केला आहे.

आंबेडकर म्हणाले, सत्ताधारी श्रीमंत मराठ्यांनी गरीब मराठ्यांच्या मतावर स्वतःच्या संपत्तीत आणि सत्तेत निरंतर वाढच केलेली आपल्याला दिसते. आपण पुन्हा एकदा हा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. आंदोलन व लोक जागृतीद्वारे या विषयावर गांभीर्य निर्माण केले आहे. परंतु, दुर्दैवाने सत्ताधारी राज्यकर्ते अतिशय निर्दयी होऊन आपल्या आमरण उपोषणाला दुर्लक्षित करत आहेत.वर्तमानातील या सत्तेला मानवी चेहरा नाहीय असेच म्हणावे लागत आहे.

मोदींवर निशाणा...

मध्यंतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) शिर्डी येथे येऊन गेले. परंतु, त्यांनीदेखील मराठा समाजाच्या आरक्षणाचा साधा उल्लेखदेखील केला नाही. यापूर्वीच्या राज्यकर्त्यांप्रमाणेच वर्तमानातील केंद्र आणि राज्य सरकार यांची भूमिकादेखील 'येरे माझ्या मागल्या'अशीच आहे. त्यामुळे आता आंदोलन करत राहणे ही काळाची गरज आहे.

यासाठी आपण आपली तब्येत सांभाळली पाहिजे. आपण पाणीसुद्धा घेत नाही ही चांगली गोष्ट नाही. आपण किमान नारळाचे पाणी तरी घ्यावे. वंचित बहुजन आघाडी आपल्या आंदोलनाला पाठिबा देत आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न हा केंद्र व राज्यशासनाच्या अखत्यारीतला आहे. त्यामुळे जोपर्यंत निवडून गेलेल्या आमदार व खासदारांच्या निवासस्थाना समोर धरणे आंदोलन होत नाही, तोपर्यंत केंद्र व राज्यशासन हा प्रश्न गांभीर्याने घेणार नाही आणि ते जागेवरून हलणार देखील नाही.

...म्हणून स्वतःचा जीव सांभाळावा!

या अकार्यक्षम सरकारच्या विरोधात आपला जीव धोक्यात न घालता येत्या निवडणुकीत याच सरकारमधील किंवा सर्वच पक्षांमधील आमदार, खासदार, मंत्री यांना सत्तेतून खाली कसे उतरवता येईल, यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणे आवश्यक आहे. गरीब मराठ्यांचे आर्थिक साधने, रोजगार आणि शेतीची दुरवस्था यांसारखे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत जे सोडवणे काळाची गरज आहे आणि त्यासाठी तुमचं असणं अपरिहार्य आहे. पुन्हा एकवेळ आवाहन करतो की आपण स्वतःचा जीव सांभाळावा, असे आवाहन वंचितच्या प्रकाश आंबेडकरांनी पत्रातून जरांगे पाटलांना केले आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT