Pravin Pote Patil and Ravi Rana came together Sarkarnama
विदर्भ

Amravati MLC Election: कट्टर विरोधकांमध्ये दिलजमाई! प्रवीण पोटे-रवी राणा एकत्र; विधान परिषदेचे गणित बदलणार?

Pravin Pote Patil and Ravi Rana came together:अमरावती विधान परिषद निवडणुकीपूर्वी मोठी राजकीय घडामोड घडली आहे. कट्टर राजकीय विरोधक मानले जाणारे प्रवीण पोटे पाटील आणि रवी राणा एकत्र आल्याने महायुतीचे पारडे जड झाल्याची चर्चा आहे

Mangesh Mahale

Amravati Politics: अमरावती विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरावतीच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. अनेक वर्षांपासून राजकीय विरोधक म्हणून ओळखले जाणारे माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील आणि आमदार रवी राणा यांनी मतभेद बाजूला ठेवत एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अमरावतीतील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाल्याची चर्चा सुरू झाली आहे.

विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार म्हणून प्रवीण पोटे पाटील मैदानात आहेत. या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत दोन्ही नेत्यांनी एकत्रितपणे निवडणूक लढण्याचा निर्धार व्यक्त केला. विशेष म्हणजे, या दोन नेत्यांमधील दुरावा कमी करण्यात भाजपचे राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे सांगितले जात आहे.

अमरावतीच्या राजकारणात प्रवीण पोटे आणि रवी राणा यांच्यातील मतभेद हा कायम चर्चेचा विषय राहिला होता. मात्र विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही नेते एकत्र आल्याने महायुतीला बळ मिळाल्याचे मानले जात आहे. या घडामोडीमुळे विरोधकांसमोरही नवे आव्हान उभे राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राणांनी दिला पाठिंबा

बैठकीनंतर प्रवीण पोटे पाटील यांनी महायुतीतील सर्व घटक पक्ष एकत्र असून निवडणुकीत विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केला. तर आमदार रवी राणा यांनीही प्रवीण पोटे हे महायुतीचे अधिकृत उमेदवार असल्याचे सांगत त्यांना पूर्ण पाठिंबा जाहीर केला.

राजकीय वर्तुळाचे लक्ष

अमरावती जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत या नव्या राजकीय समीकरणाचा काय परिणाम होतो, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. कट्टर विरोधक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दोन नेत्यांची झालेली ही दिलजमाई आगामी राजकारणासाठी महत्त्वाची ठरणार असल्याचे मानले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT