President Droupadi Murmu Sarkarnama
विदर्भ

Droupadi Murmu Maharashtra Visit: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पहिल्यांदाच महाराष्ट्र दौऱ्यावर; असा असेल दौरा

National Politics: या दोन दिवसांच्या त्यांच्या विदर्भ दौऱ्यात त्यांचा मुक्काम नागपूरच्या राजभवनात असेल.

सरकारनामा ब्यूरो

President Droupadi Murmu Maharashtra Visit: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येणार असल्याची माहिती समोर आली आहे. मंगळवारी (४ जुलै) आणि बुधवारी (५ जुलै) अशा दोन दिवसांचा त्यांचा दौरा असेल. चार तारखेला सायंकाळी सात वाजता त्या नागपूरमध्ये दाखल होतील. त्यानंतर पुढचे दोन दिवस त्या महाराष्ट्राचा दौरा करतील. राष्ट्रपतींचा पहिला महाराष्ट्र दौरा असणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,४ ते ६ जुलै दरम्यानच्या दौऱ्यात त्या विदर्भातील (Vidarbha) कोराडी, वर्धा आणि सेवाग्राम या ठिकाणांना भेटी देणार आहेत. 4 जुलैला त्या नागपूरातील राजभवानात दाखल होतील. त्यानंतर कोराडी येथील रामायण कल्चरल सेंटरचं 5 जुलैला राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन करण्यात येईल. त्या नंतर राष्ट्रपती हेलिकॉप्टरने वर्ध्याला जातील. ६ जुलै रोजी त्या सेवाग्रामला भेट देतील. या दोन दिवसांच्या त्यांच्या विदर्भ दौऱ्यात त्यांचा मुक्काम नागपूरच्या राजभवनात असेल. राष्ट्रपतींच्या दौऱ्यामुळे प्रशासनेही त्यांच्या दौऱ्याची तयारी सुरु केली आहे.

५ जुलैला सकाळी त्या हेलिकॉप्टरने गडचिरोलीला रवाना होतील. गडचिरोलीत सकाळी साडेदहाच्या दिक्षांत समारंभ पार पडल्यानंतर त्या पुन्हा नागपुरात येतील. त्यानंतर नागपूरातील सायंकाळी कोराडी येथील भारतीय विद्या भवनच्या सांस्कृतिक केंद्राचे त्यांच्या हस्ते लोकार्पण होईल. (Droupadi Murmu Maharashtra Visit)

दुसऱ्या दिवशी ६ जुलै २०२३ रोजी सकाळी हेलिकॉप्टरने वर्ध्याला जातील. साडेअकराच्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या दिक्षांत सोहळ्यात सहभागी होतील. त्यानंतर दुपारी दीड वाजता नागपूर विमानतळावरून मुंबईला जातील. मुंबईत सिद्धिविनायक मंदिरात दर्शन, आणि ७ जुलैला शिर्डीमध्ये साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर त्या सायंकाळी दिल्लीकडे रवाना होतील. (Maharashtra Politics)

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT