Devendra Fadnavis Sarkarnama
विदर्भ

Devendra Fadnavis: पुण्यातील दादागिरी मोडून काढणारच! CM फडणवीसांचा निर्वाणीचा इशारा; म्हणाले, यासाठी जो मदत करेल...

Devendra Fadnavis: नागपुरात बोलताना आता पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी निर्वाणीचा इशारा दिला आहे.

Rajesh Charpe

Devendra Fadnavis: केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांना नुकतेच पुण्यात लोकमान्य टिळक पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. या कार्यक्रमाला अजितदादा पवार आणि चंद्रकांतदादा पाटील उपस्थित होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांकडून पुण्यातील दादागिरीचा उल्लेख झाला. त्यानंतर पुण्यातील दादागिरीवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. यावर नागपुरात बोलताना आता पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी निर्वाणीचा इशारा दिला आहे.

दादागिरी मोडून काढणारच - फडणवीस

पुण्यातील दादागिरी सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. यावर नागपुरात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "पुण्यातील काही उद्योग या दादागिरीला कंटाळून इतर राज्यात जात आहे. यावर सर्वांचे एकमत करावे लागले. कारण खूप मोठ्या प्रमाणावर राजकीय दादागिरी पुण्याच्या उद्योगांमध्ये पाहायला मिळते आहे. विविध पक्षाचे हे दादा त्या पक्षाचं नाव घेऊन दादागिरी करतात. मी तर ही दादागिरी मोडून काढणारच आहे पण त्यात जो जो मदत करेल त्याचं स्वागतच आहे"

गडकरींच्या पुरस्कार सोहळ्यात फडणवीसांची फटकेबाजी

पुण्यात नितीन गडकरी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. यावेळी भाषणादरम्यान मुख्यमंत्र्यांनी पुण्यातील दादांचा विषय काढला होता. हा विषय खरंतर पुण्यातील उद्योगांमधील दादागिरीचा नव्हता. तर अजित पवार, चंद्रकांत पाटील यांच्यासंदर्भातला होता. सुरुवातील आपल्या भाषणात बोलताना अजित पवार म्हणाले की, चंद्रकांत दादांना अजून पुणेकर कोल्हापूरचेच समजतात. त्यावरुन हशा पिकला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी चंद्रकांत दादा नाराज दिसत आहेत, त्यांना परत कोल्हापुरला जायचं आहे का? असं मिश्लिपणे म्हणाले. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस बोलताना म्हणाले की, पुण्याचे दुसरे दादा हे कधीही दादागिरी करत नाहीत असे चंद्रकांतदादा पाटील. काही लोक दादागिरी करत नाहीत पण ती त्यांच्या व्यक्तीमत्वातच दिसते, असं त्यांनी म्हटलं होतं.

अजित पवारांचा इशारा

दरम्यान, अजित पवारांनी पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना म्हटलं की, "महाराष्ट्रात कुठेही दादागिरी आम्ही खपवून घेत नाही. पुण्यातले दोन्ही सीपी आणि पुणे ग्रामीणचे एसपी यांना आम्ही स्पष्टपणे सूचना दिलेल्या आहे की, कुठल्याही पक्षाशी संबंधित असणारे लोक इंडस्ट्रीवाल्यांना त्रास देत असतील, तर त्यांच्यावर केसेस दाखल करा, कारवाई करा. तीन-चार वेळेला केस दाखल करून त्यांनी ऐकले नाही तर त्यांच्यावर मकोका लावा अशा स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत. पुण्यातच नाही तर महाराष्ट्रात कुठेही येणाऱ्या उद्योगपतींना त्यांची गुंतवणूक केल्यानंतर जी काही मदत झाली पाहिजे, सुविधा मिळाल्या पाहिजे, त्या देण्याचे काम महायुती सरकारचे आहे आणि ते आम्ही पार पाडत आहोत"

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT