Sunil Tatkare: "1978 नंतर... पुन्हा एकदा पवारांना मुख्यमंत्रीपद"; सुनील तटकरेंनी नेमकं काय म्हटलंय?

Sunil Tatkare: माणगाव इथं पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात तटकरे बोलत होते, यावेळी त्यांनी आपल्या मनातील इच्छा बोलून दाखवली.
Sunil Tatkar_Ajit Pawar
Sunil Tatkar_Ajit Pawar
Published on
Updated on

Sunil Tatkare: राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा आज माणगाव इथं पार पडला, यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यासपीठावर बसलेले पक्षाध्यक्ष अजित पवार यांच्यासमोरच आपल्या मनातील इच्छा बोलून दाखवली. अजित पवारांच्या मुख्यंमत्रीपदाबाबत त्यांनी विधान केलं. यासाठी त्यांनी १९७८मधील पुलोद सरकारचा दाखला दिला.

Sunil Tatkar_Ajit Pawar
Devendra Fadnavis: "...तर तुम्हाला अटक करण्याचं कारण नाही"; फडणवीसांचं जनसुरक्षा कायद्यावरुन राज ठाकरेंच्या आव्हानाला उत्तर

सुनील तटकरे नेमकं काय म्हणाले?

"उपमुख्यमंत्रीपद १९७८च्या आसपास पहिल्यांदा झालं पुलोदचं सरकार असताना. त्यानंतर इतक्या वेळेला उपमुख्यमंत्रीपदाची शपथ राज्यात कोणी घेतली असेल तर ती अजित पवारांनी. जसा सचिन तेंडुलकरचा विक्रम कधी मोडला जाणार नाही तसा दादांचा उपमुख्यमंत्रीपदाचा आणि अर्थसंकल्पाचा विक्रम कधी मोडला जाणार नाही, याच्यात कोणाच्या मनात शंका असण्याचं कारण नाही.

पण याचा अर्थ आम्ही तेवढ्यापुरते सिमित आहोत का? तर नाही. आमच्याही मनात आहे, राज्यभरातील जनतेच्या मनातील अपेक्षा आहेत की दादा राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत, ही आमच्या सर्वांच्या मनातील इच्छा आहे. पण आम्ही राजकीय वास्तववादी आहोत. यामध्ये राजकारण, संख्याबळ आणि अजित पवारांची कष्ट करण्याची आयुष्यभराची मेहनत, राजकीय प्रचंड इच्छाशक्ती याचा समावेश आहे. जनतेच्या हिताच्या दृष्टीनं दूरगामी त्यांनी मांडलेले विचार, हे आपल्या सर्वांना प्रेरणादायी ठरतात" अशा शब्दांत सुनील तटकरे यांनी या मेळाव्यात आपली इच्छा व्यक्त केली.

Sunil Tatkar_Ajit Pawar
Uddhav Thackeray News : उद्धव ठाकरेंसाठी दिलासा; 'मातोश्री'वर मोठी घडामोड; 'ही' ताकदवान संघटना शिवसेनेत विलीन

अजित पवार काय म्हणाले?

दरम्यान, माणगावमधील काही नेत्यांचे पक्षप्रवेश या मेळाव्यात झाले, यावेळी अजित पवारांनी सर्वांना मार्गदर्शनही केलं. यावेळी त्यांनी महायुती सरकारमध्ये आपण विकासाची काम करण्यासाठी आलेलो आहोत याचा पुनरुच्चार केला. तसंच सत्तेत असताना लोकांची काम झाली पाहिजे अशा सूचना सर्वांना केल्या. सत्तेत असताना जर आपण काम करणार नसू तर मग सत्ता नसताना ते काम झालं असतं तर बरं झालं असतं असं म्हणण्याला अर्थ नाही असंही अजित पवार यावेळी म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com