Sudhir Mungantiwar, Rahul Gandhi
Sudhir Mungantiwar, Rahul Gandhi Sarkarnama
विदर्भ

Rahul Gandhi Flying Kiss : राहुल गांधींचा 'फ्लाईंग किस' मोदींना पुन्हा निवडून देणार; सुधीर मुनगंटीवारांचा टोला

राजेश चरपे

Nagpur News : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनासुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच निवडून यावे असे वाटत असावे. यातूनच ते 'फ्लाईंग किस'सारखे कृत्य वारंवार करीत असल्याची उपहासात्मक टीका राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नागपूरमध्ये केली. (Latest Political News)

"काँग्रेसच्या म्हणण्यानुसार राहुल गांधी पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत. असे असतानाही संसदेत अपमानजनक व्यवहार करणे त्यांच्याकडून अपेक्षित नाही. त्यांच्या विरोधात २२ महिला खासदारांनी तक्रार केली आहे. या कृत्यातून गांधींना जगासमोर देशाचा गौरव कमी करण्याचा काम केले आहे. त्यांच्या अशा कृतीला माफी नाही. जनता सुज्ञ असून आता त्यांना निवडणुकीत ‘फ्लाईंग’ जागा दाखवेल", अशी टीका मुनगंटीवारांनी केली आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांचाही मुनगंटीवारांनी समाचार घेतला आहे. "राऊत मती भ्रष्ट झाल्यासारखे बोलतात. चुकीच्या गोष्टींचे समर्थन करणे हेसुद्धा चुकीचे आहे. राहुल गांधी यांचा फ्लाईंग किस हा देशाला दिला आहे, असे राऊत म्हणत असेल तर काय आदर्श प्रस्थापीत करत आहेत? तुमच्या घरापर्यंत आग पोहचेल तेव्हाच कळेल," अशी हल्ला मुनगंटीवारांनी केला.

संजय राऊत यांना विरोधकांच्या प्रत्येक कृतीची समर्थन मजबुरीने करावे लागत आहे. ते करीत असताना कोण बरोबर, कोणाची चूक याचाही ते विचार करीत नाही. सकाळी उठल्यापासून ते बोलत असतात आणि उद्धव ठाकरेंना अडचणीत आणतात, असाही टोला मुनगंटीवारांनी राऊतांना लगावला आहे.

युती शिवसेनेने तोडली असे सांगताना मुनगंटीवार म्हणाले, "सामनातून टीका करणाऱ्यांवर विरोधात बसण्याची वेळ आली आहे. युती भाजपकडून तुटली नाही. उद्धव ठाकरे यांनी आधीच युतीत जायचे नाही असे ठरवले होते. आमचे निरीक्षक जेष्ठ, अनुभवी नेते आले असताना त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आदित्य ठाकरेंसारखे नवख्या व्यक्तीला पाठवले होते. तेव्हाच आमच्या लक्षात आले की उद्धव यांना युती करायची नाही. तेव्हाचे फुटेज काढा, किती वाजता युती तुटली, त्यांच्या तीन दिवस आगोदार काय झाले, ते बघा" असेही मुनगंटीवार यांनी सांगितले.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT